मराठी म्हणी व अर्थ *Marathi Mhani List With meaning

मराठी म्हणी व अर्थ *Marathi Mhani List With meaning

चौथी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या म्हणी त्यांच्यासोबत त्यांचे अर्थही. या सर्व म्हणी परीक्षेला उपयोगी पडणाऱ्या आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करून चांगली परीक्षा द्यावी.

१. उचलली जीभ लावली टाळ्याला – अव्चाराने वागणे

२. एका किंवा एकाच माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.

३. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे – स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.

४. अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

५. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपण नुकसानकारक ठरते.

६. असतील शिते तर जमतील भुते – आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते.

Marathi vakyapracara va mhani https://amzn.eu/d/4pcAvV1

७. चार दिवस सासूचे चार दिवसं सुनेचे – प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.

८. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे – खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

९. एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक गोष्ठी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.

१०. आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पहावी; नंतर देवधर्म करावा.

११. तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले – फायद्याच्या दोन्ही गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाऊन क्षुल्लकगोष्टयेणे.

१२. अडला नारायण गाढवाचे पाय धरी – थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खांची मनधरणी करावी लागते.

१३. आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.

१४. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.

Marathi vakyapracara va mhani https://amzn.eu/d/4pcAvV1

१५. थेंबे थेंबे तळे साचे – थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होतो.

१६. दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते.

१७. दाम करी काम – पैशाने सर्व कामे साध्य होतात.

१८. नाक दाबले की तोंड उघडते – अडवणूक करून काम साधणे.

१९. नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकर शिरजोर, कुवतीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे.

२०. नवी विटी नवे राज्य – सगळीच परिस्थिती नवीन असणे.

२१. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाहीतर तो दुसऱ्यास काय देणार ?

२२. बुडत्याचा पाय खोलात – अधोगती होऊ लागली की अनेक बाजूंनी होते.

२३. कर नाही त्याला*डर कशाला ? – निरपराधी माणूस निर्भय असतो.

२४. कानामागून आली आणि तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ मार्णसाने वरचढ ठरणे.

२५. पेरावे तसे उगवते – चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते.

Nivadak Suvichar, Mhani Ani Vakpracharncha Kosh – Marathi https://amzn.eu/d/b8OGdjH

२६. प्रयत्नांती परमेश्वर – प्रयत्नांती असाध्य गोष्ट साध्य करता येते.

२७. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.

२८. कोळसा उगाळावा तितका काळांच – वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यांतून वाईटच निघणार.

२९. कोल्हा कांकडीला राजी – क्षुद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.

३०. खाई त्याला खवखवे – वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

३१. बडा घर पोकळ वासा – दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात तिचा अभाव.

३२. बळी तो कान पिळी – शक्तीमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो.

३३. ज्याचे करावे बरे तो म्हणतो आपलेच खरे – एखाद्याचे भले करायला जावेतर तोत्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो.

३४. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – उपकारकर्त्याचे उपकार स्मरून. त्याची बाजू घेणे.

३५. मांजरांच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ?- जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही.

३६. मनात मांडे पदरात धोंडे – केवळ दिवास्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही.

३७. वासरांत लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.

३८. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – हट्टापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही.

३९. रोज मरे त्याला कोण रडे – वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी स्वारस्य उरत नाही.

४०. चोराच्या हातची लंगोटी – लबाड कंजूषाकडूंन थोडे मिळाले तरी भाग्याचे.

४१. गाढवाला गुळाची चव काय ?- मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

४२. गुरूची विद्या गुरुला फळली – एखादयाचा डाव त्याच्यारच उलटणे.

४३. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – प्रतिकूल परिस्थितीत सारेच उलट वागू लागतात.

४४. जळात राहून माशाशी वैर – सहवासात रहायच्या व्यक्तीशी वैर करू नये.

४५. लहान तोंडी मोठा घास – आपली योग्यता नसताना मोठ्यांस सल्ला देणे.

४६. लेकी बोले सुने लागे – एखादयाला उद्‌देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

४७. सुंठीवाचून खोकला जाणे – उपचाराशिवाय दोष निवारण होणे.

४८. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी-बांधता येतो.

४९. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये- कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.

५०. गर्जेल तो पडेल काय ? – केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.

५१. गर्वाचे घर खाली – घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.

५२. शहाण्याला शब्दांचा मार – सूज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो.

५३. नव्याचे नऊ दिवस – नवीन गोष्टीचे काही दिवस कौतुक होते.

५४. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ – मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्यं करणार.

५५. गोगल गाय अन्‌ पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

Marathi Bhasetila Asbhya Mhani Ani Vakpracara (मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार) https://amzn.eu/d/jakvWni

५६. घरोघरी मातीच्या चुली – सर्वत्र सारखीच परिस्थिती.

५७. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने – दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.

५८. नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे.

५९. शेंडी तुटो की पारंबी तुटो – पक्का निश्चय करणे.

६०. शेरास सव्वाशेर – सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो.

६१. अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

६२. असंगासी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.

६३. इकडे आड तिकडे विहिर – दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे

६४. आंधळे दळते नि कुत्रे पिठं खाते- एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.

६५. शितावरून भाताची परीक्षा – वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.

६६. सगळे मुसळ केरात – मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे.

६७. गर्जेल तो पडेल काय ? – केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.

६८. गर्वाचे घर खाली – घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.

६९. सरड्याची धाव कुंपणापर्यंत – प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते.

७०. साखरेचे खाणार त्याला देव देणार – सुदैवी माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.

७१. हातच्या काकणाला आरसा कशाला – प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.

७२. हाजीर तो वजीर – वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो.

७३. यथा राजा तथा प्रजा – प्रमुख व्यक्‍तीच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्‍तीवर प्रभाव पडतो.

७४. रात्र थोडी सोंगे फार – कामे पुष्कळ त्यामानाने वेळ थोडा.

७५. खाण तशी माती – आईवडीलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक हृअसते.

७६. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा.

७७. खायला काळ भुईला भार – निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.

७८. वराती मागून घोडे – काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे, एखादी गेष्ट घडून गेल्यावर मदतीस येणे.

७९. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने. थोरांचे नुकसान होत नाही.

८०. खोट्याच्या कपाळी गोटा – वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते.

८१. गरज सरो वैद्य मरो – गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे.

८२. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे – सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे.

८३. दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्यापासून लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो.

८४. देश तसा वेश – परिस्थितीनुसार वागणे विल्या .

८५. दे माय धरणीं ठाय- पुरे पुरेसे होणे.

८६. बैल गेला नि झोपा केला – हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ.

८७. चोराच्या मनात चांदुणे – वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

८८. वड्याचे तेल वांग्यावर – एकाबद्‌दल दुसऱ्यास दोष देणे.

८९. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.

९०. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही – मुळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.

९१. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकमेकांची वर्मे ठाऊक असणाऱ्या माणसांशी गाठ पडणे.

९२. ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याला यश आले तो कर्तबगार.

९३. हत्ती गेला शेपूट राहिले – बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे.

९४. चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

९५. अंगापेक्षा बोंगा मोठा – खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे.

९६. भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्याच्या विषयी अपेक्षा आहेत अशा व्यक्‍तीने संपूर्ण निराशा करणे.

९७. भित्या पाठी ब्रह्मराक्षस – भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.

Mhani aani Vakprachar https://amzn.eu/d/7au52YB

९८. ऐकावे जनाचे करावे मनाचे – अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

९९. करावे तसे भरावे – वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

१००. काप गेले नि भोके रांहिली – वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.

१०१. भीक नको, पण कुत्रं आवरं – एखादयाने कार्यास मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न न आणू नयेत अशी स्थिती.

१०२. पदरी पडले पवित्र झाले – स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान मानणे.

१०३. पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच.

१०४. पाचामुखी परमेश्‍वर – पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे.

१०५. पी हळद अनू हो गोरी – एखाद्या कृत्याचा त्वरीत लाभ मिळावा अशी अपेक्षा करणे.

१०६. दोघांचे भांडण तिसऱ्याचां लाभ – दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तीचा फायदा होतो.

१०७. देखल्या देवा दंडक्त – एखादी व्यक्‍ती सहजगत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे.

१०८. झाकली भूठ सव्वा लाखाची – व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते , मौन पाळून अब्रू राखणे.

१०९. टाकीचघाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.

११०. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखाद्या गोष्टीचे नावीन्य अल्पकाळच टिकते.

१११. दैव देते आणि कर्म नेते – सुदैवाने,लाभलेली वस्लू नियतीने गमावून बसणे.

११२. पालथ्या घागरीवर पाणी – केलेला उपदेश वाया जाणे.

११३. उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी गुण श्रोडे असणारा बढाई मारतो.

११४. उंदराला मांजर साक्ष – वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.

११५. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता – मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो.

११६. भुकेला कोंडा निजेला धोंडा – अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते.

११७. मनी वसे ते स्वप्नी दिसे – जसा विचार तशी स्वप्ने पडण.

११८. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.

११९. पुढच्यास ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे.

१२०. नाचता येईना अंगण वाकडे – उणिवा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.

१२१. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्या व्यक्‍तीने केलेली चांगली गोष्ण्ी वाईट वाटते.

१२२. दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसांत देखील दोष असतात.

१२३. दुरून डोंगर साजरे – दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींचे खरे स्वरुप जवळून समजते.

१२४. दुष्काळात तेरावा महिना – अगोदरच्या संकटात आणखी भर.
१२५. तळे राखी तो पाणी चाखी – स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.

१२६. ताकापुरते रामायण – एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.

१२७. नाव मोठे लक्षण खोटे – भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी.

१२८. पुराणातील वांगी पुराणात – उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.

१२९. देव तारी त्याला कोण मारी – देवं पाठिराखा असलेल्याचे कोणीही नुकसान करू शकणार नाही.

१३०. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी – दोन्ही गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही.

१३१. दृष्टी आड सृष्टी – आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे.

१३२. न कर्त्याचा वार शनिवार – न करायंचे काम सबबी सांगून टाळणे.

१३३. बाप तसा बेटा – बापाचे गुणावगुण मुलाच्या अंगी असणे.

१३४. एका हाताने टाळी वाजत नाही – भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असतं नाही.

१३५. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळपणानेमूर्खासारखे वर्तन करणे.

१३६. काखेत कळसा आणि गावाला वळसा – हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.

१३७. कामापुरता मामा – काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.

१३८. आपला हात जगन्नाथ – आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.

१३९. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.

201 Mhani Vakyaprachar https://amzn.eu/d/0PJrv5Z


201 Mhani Vakyaprachar https://amzn.eu/d/0PJrv5Z

तर हे होते मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला कंमेंट करून सांगा व या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा.

मराठी म्हणी व अर्थ *Marathi Mhani List With meaning

मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani List With Meaning | Marathi Mhani..

Leave a Comment