सोयाबीन लागवड नवीन तंत्रज्ञान…

जमीन

मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी.हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही.उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते

पूर्वमशागत-

जमीन खोल नांगरुन घ्या. भरपूर प्रमाणात शेणखत टाकून घ्या.पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी.

बीजप्रक्रिया.

प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम + एक ग्रॅम कार्बेन्डाझिम या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

जाती

एमएयूएस 70, एमएयूएस 81, एमएयूएस 158, एमएयूएस 47. विदर्भ – एमएयूएस 71, एमएयूएस 81, जेएस 93-05 आणि जेएस 335

आंतरपीक पद्धती

सोयाबीन + भुईमूग  

सोयाबीन + बाजरी 

तूर + सोयाबीन

सोयाबीन + ज्वारी

कपाशी + सोयाबीन

सोयाबीन लागवड कशी करावी ?

सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी लागवड योग्य अंतरावर करणे आवश्यक आहे. एकरी रोपांची संख्या व प्रत्येक रोपाचे पुरेपूर पोषण यातून आपण जमिनीच्या मगदूरा निहाय उच्चतम उत्पादन घेऊ शकता. लागवड खालील प्रमाणे करावी.

▫️टोकण पध्दत : 3 फुटावर किंवा 3.5 फुटावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूला 6 इंचावर बियाणे टोकून घ्यावे. प्रत्येक ठिकाणी 3 -4 बिया टोकून घ्याव्यात.
▫️बीबीएफ पध्दत (रूंद वरंबा सरी पध्दत) : पेरून – पारंपारिक पध्दत : दोन ओळीतील अंतर 1.5 फुट – (45 से.मी.) ठेवावे तसेच दोन झाडातील अंतर 10 से.मी. ठेवावे.

Leave a Comment