गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान. शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान.  शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् पावसाचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात आला आहे.

सोलापूरमध्ये द्राक्षबागा भुईसपाट

सोलापूरच्या बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. श्रीपत पिंपरीतील अशोक पिंगळे या शेतकऱ्याची 2 एकर भाग वादळी वाऱ्याने आडवी झाली. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जवळपास 18 ते 20 लाखांचा फटका बसला आहे.

हवामान खात्याने या भागात गारपीट व अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. काही वेळताच प्रचंड गारपीट झाल्याने जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये धांदल उडाली. यात अकोलादेव, टेंभूर्णी, भारज, काळेगाव, नांदखेडा अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता

या ठिकाणी अलर्ट

आज हवामान विभागाने २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यास यलो अलर्ट २७ फेब्रुवारी रोजी दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस आणि गारपिटीचा जोर प्रचंड होता. त्यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते. तसेच अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी (Farmers) हवालदिल झाले आहेत. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् पावसाचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात आला आहे.

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान.  शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.

जालन्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये ज्वारी, मिरची, शेडनेट भाजीपाल्याचे चांगलेच नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्याने शेतातील उभी पीक झोपून गेली. 

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान.  शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान. शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.

Leave a Comment