PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?


PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?

विदर्भासह मराठवाडा आणि इतर भागात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तिथे ते देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 वा हप्ता जारी केला. यामध्ये 21 हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यापूर्वी, 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला होता. तो देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरीत करण्यात आला होता. 

PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?

PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक?

तुम्ही लाभार्थी असाल तर, तुम्ही मेसेजद्वारे हप्त्याचे पैसे तपासू शकता. तुम्हाला सरकारकडून आणि बँकेकडूनही एक मेसेज येतो ज्यामध्ये तुम्हाला 2 हजार रुपयांचा हप्ता ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली जाते.

पीएम किसानचा 16 वा हप्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता आज 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल.

जर काही कारणास्तव तुम्हाला हप्त्याचा मेसेज आला नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या खात्यात 16 व्या हप्त्याचे पैसे आले आहेत की नाही ते तपासू शकता.

तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक एंट्री करून तुम्ही हप्त्याची रक्कम खात्यात ट्रान्सफर झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी आणि योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती प्रविष्ट केली होती. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. योजनेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून ते योग्य मदत घेऊ शकतात.

PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?

Leave a Comment