टोमॅटो लागवड करून मिळवा लाखोचे उत्पन्न. Tomato farming best option.

टोमॅटो लागवड करून मिळवा लाखोचे उत्पन्न. Tomato farming best option.

आंध्र प्रदेश हे भारतातील टोमॅटोचे सर्वात मोठे उत्पादक आहे.

टोमॅटो लागवड करून मिळवा लाखोचे उत्पन्न.  Tomato farming best option.

टोमॅटो ही उन्हाळी हंगामातील भाजी आहे आणि सामान्यतः उन्हाळी वार्षिक म्हणून घेतली जाते. टोमॅटोचे बियाणे मार्च ते जून दरम्यान घरामध्ये सुरू करणे आवश्यक आहे. तुमच्या पॉट गार्डनमध्ये टोमॅटो कसे वाढवायचे ते येथे आहे

टोमॅटोच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी सुमारे 11% टोमॅटोची लागवड भारतात होते

पोर्तुगीजांनी 16 व्या शतकात टोमॅटोची ओळख भारतात केली आणि आता भारतीय जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे. त्यांच्या उच्च किंमतीमुळे अनेक भारतीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे.

टोमॅटोच्या रोगांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे रोग

टोमॅटो मधील रोग

टोमॅटोच्या रोगांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे रोग

माहितीदाता:

टोमॅटोच्या रोगांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे रोग

 मर रोग: रोपवाटीकेतील रोपांवर हा रोग येतो. या रोगाची लक्षणे म्हणजे रोपे कोमेजतात व कोलमडल्यासारखी दिसतात. यासाठी बियाणे पेरताना थायरम या औषधाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. रोपे मरगळल्यासारखी वाटत असतील तर २५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराइड / १० लिटर पाण्यात मिसळून रोपांना अळवणी घालावी आणि फवारणी करावी. रोपवाटीकेतील पाण्याचा निचरा करून घ्यावा.

 पानावरील करपा: पानावर तपकिरी काळे डाग पडतात. त्यासाठी ३५ ग्राम डायथेन एम-४५ हे औषध १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी. नत्राची आवश्यक इतकीच मात्र देणे. शेत नेहमी तण विरहित ठेवावे. रोगग्रस्त पाने, झाडाच्या बुडाकडील वाळलेली पाने काढून झाड स्वच्छ ठेवावे.

फळावरील चट्टे: हा रोग दमात हवामानात येतो. कवळ्या फळांवर उंचवट्यासारखे गोल खरबरीत काळसर तपकिरी चट्टे पडतात. त्यासाठी Streptocycline/६ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ३५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराइड /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी: पानावर पांढरी पावडर पद्लाय्सारखे दिसते. नंतर पाने पिवळी पडून वळतात. त्यासाठी थायोव्हीट ३० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डायनोकॅप ६ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 विषाणूजन्य रोग: हा रोग होऊ नये यासाठी प्रथमतः ज्या किडीद्वारे याचा प्रसार होतो म्हणजे, फुलीकीडे, तुडतुडे, मावा इ. चा वेळीच बंदोबस्त करावा. त्यासाठी शेतामध्ये पिवळे चिकट बोर्ड लावावेत (हेक्टरी १२). रोपवाटिका नेटमध्ये करावी. तसेच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. इमिडाक्लोप्रिड ६ मिली किंवा डायमिथोएट १५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टोमॅटो फळाचे महत्त्व : 

आहारदृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक आहे.

भाजी व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते. केचप, सूप, सॉस, चटणी इ. पदार्थ बनविता येतात. 

टोमॅटोमधील लायकोपीन या अल्कलाइड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण कमी होते. 

हवामान टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते.तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. पिकास इजा होऊन उत्पादनात मोठी घट येते.जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो फळांची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो.

 जमीन :

चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. 

हलक्‍या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते. 

पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी काळीभोर जमीन टाळावी, तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्‍या व उथळ जमिनीत घेऊ नये. 

जमिनीचा सामू हा ६ ते ७.५च्या दरम्यान असावा. 

जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी व त्यास योग्य उतार द्यावा, म्हणजे पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही. 

क्षारयुक्त चोपन व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते. 

जमिनीत चर काढले तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षारांचाही निचरा होतो. 

अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच निमॅटोड असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

लागवडीसाठी जमीन तयार करणे :

जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी २० टन प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. 

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ १.०५ लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

 महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० ते ७० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत वाढू शकते.

Leave a Comment