RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण.RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! RTE addmission open. RTE चे फॉर्म आले लवकर भरा.

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण.RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! RTE addmission open.

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण.RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! RTE addmission open. RTE चे फॉर्म आले लवकर भरा.

देशात RTE कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये त्याची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी अधिसूचना काढली.

 सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रक्रिया ऑफलाईन होती. पण त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या झाली नाही.

त्यावेळी प्रत्येक ठिकाणी पालकांना जावं लागायचं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अर्ज करावे लागायचे. शिवाय आपल्या जवळ कोणत्या शाळा आहेत, याबाबत कल्पनाही पालकांना नसायची, त्यामुळे सुरुवातीला याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

RTE हे शिक्षणाच्या अधिकाराचे संक्षिप्त रूप आहे जे भारतीय संविधानाच्या कलम 21-A मध्ये स्थापित केलेला मानवी हक्क आहे जो 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देतो.

शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा 6 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करतो.

आरटीई प्रवेश 2024 महाराष्ट्र पात्रता निकष

तुमचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे . केवळ वंचित किंवा कमी उत्पन्न असलेल्या भागातील मुलेच अर्ज करू शकतात. पालकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आरटीई’तील बदलानुसार प्रवेशाची नियमावली शालेय शिक्षण विभागाने अंतिम केली आहे. त्यानुसार पहिलीत प्रवेश घेताना सुरवातीला घरापासून एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळांची निवड करावी लागेल. 

त्यानंतर शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि या दोन्ही प्रकारच्या शाळा तेवढ्या अंतरात नसल्यास स्वयंअर्थसहाय्यिता शाळेचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे.

ठळक बाबी…

गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे पडताळणी समिती असेल, महापालिका स्तरावरही अशीच समिती नेमली जाईल.

‘आरटीई’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाकडे रेशनकार्ड, वाहन परवाना, वीज-टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्सचे बिल, आधार किंवा मतदानकार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबूक यापैकी एक पुरावा असावा.

भाडेतत्त्वावरील पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार असावा. भाडेकरार अर्ज भरण्यापूर्वीचा असावा व तो ११ महिने किंवा त्याहून अधिक काळाचा असावा. 

भाडेकराराची पडताळणी होईल आणि त्याठिकाणी पालक राहत नसल्यास प्रवेश रद्द होईल.

उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी) २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षातील असावा. 

जातीचा दाखलाही जरूरी, दिव्यांग मुलासाठी जिल्हा शल्यचिकित्स, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जरूरी.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण आवश्यक आहेत. 

दरम्यान, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्याने आरटीईतून प्रवेश घेतला असल्यास पुढील आठवीपर्यंतचे शिक्षण त्याला त्या परिसरातील शाळेत मोफत घेता येईल.

अपवादात्मक परिस्थितीत अनुदानित, सरकारी व स्वयंअर्थसहाय्यिता (इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा) शाळा विद्यार्थ्याच्या एक किमी अंतरावर नसेल तर त्या विद्यार्थ्यांना तीन किमी अंतरावरील शाळा निवडता येईल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक शाळा वगळण्यात आल्या आहेत.

 पण, एखादी शाळा पुढील काही वर्षात अल्पसंख्यांक झाल्यास आता ‘आरटीई’तून त्याठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे लागेल, असेही या नियमावलीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवासाचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, फोटो आयडी किंवा दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होईल.

आरटीई’अंतर्गत शालेय शिक्षण विभागाने शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे.

 पण, एखाद्या पालकाला अनुदानित शाळेऐवजी त्यांच्या परिसरातील (एक किमी अंतर) जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना तसाही प्रवेश घेता येईल. 

ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल आणि इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यिता शाळा असल्यास त्यांना त्याठिकाणी प्रवेश घेता येणार आहे. 

पण, तत्पूर्वी शाळांचे मॅपिंग होईल आणि खरोखरच त्या विद्यार्थ्याच्या घरापासून अनुदानित किंवा सरकारी शाळा नसल्याची खात्री केली जाईल.

RTE कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात शिक्षणाचा अधिकार, पालकांचं कर्तव्य आणि इतर अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

याच कायद्यात कलम 12(1) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण.RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! RTE addmission open.

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण.RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! RTE addmission open. RTE चे फॉर्म आले लवकर भरा.

Leave a Comment