हवामान खात्याने दिला अवकाळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांवर आले परत संकट. heavy rain 🌧️🌧️ possible.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाहीलाही होणार आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील 48 तासांतमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.
राज्यात काही भागात येलो अलर्ट

हवामान खात्याने दिला अवकाळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांवर आले परत संकट. heavy rain 🌧️🌧️ possible.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) दिसून येत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या (Maharashtra Rain Update) सरी बरसताना दिसत आहेत. राज्यात वीकेंडला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

काही भागात उन्हाच्या झळा

एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील 24 तासात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा 

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात पुढील 24 तास पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.

कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट

अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 -40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf भेट द्यI

अमरावतीत अवकाळी पावसाचा फटका

शुक्रवारी रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस अमरावती विभागात झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अमरावतीत नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहे

Leave a Comment