पपई लागवड करून मिळवा लाखोचा नफा. आधुनिक पद्धतीने करा पपईची लागवड.

भारतात पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर-ऑक्टाबर, आणि जाने-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जून ते ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते. पपई फळपिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असल्याने व अशी झाडे फुलोरा आल्याशिवाय ओळखता येत नसल्याने लागावडीच्या ठिकाणी दोन रोपे लावावी.

लागवड पद्धत ४५ बाय ४५ बाय ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत व लागवडीसाठी दीड दोन महिन्यांची रोपे वापरावीत. खत व्यवस्थापन शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे पपई उच्च दर्जाची व मधुर स्वादाची तयार होते.

आवश्यकतेनुसार रासायनिक खते मिश्रखताच्या स्वरूपात द्यावीत. खत देताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पाणी व्यवस्थापन पपईत ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. ठिबक असल्यास उत्पादनात वाढ होते. आंतरपिके पपई बागेत मूग, उडीद, चवळी, वाटाणा, श्रावण घेवडा, सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेता येतात

साधारणपणे पपईचे रोप लागवडीपासुन ३ ते ७ महिन्यांनी फुले येतात व त्यानंतर फळे काढणीसाठी चार महिन्यांनी तयार होतात.

पपई लागवड कधी करावी

हवामान
पपईचे झाड उष्ण कटिबंधात वाढणारे आहे. कडाक्याची थंडी व जोरदार वारे या पिकाला हानीकारक ठरतात. पपई पिकास सरासरी तापमान १५ ते ३० अंश से.ग्रे. आणि वार्षिक पाऊसमान १५०० मि. मि. मानवते. पपईच्या वाढीसाठी जास्तीत जास्त तापमान ४४ अंश से. ग्रे. व कमीत कमी १० अंश से. ग्रे पर्यंत सहन करू शकतात.


जमीन
उत्तम निचऱ्याची, सुपीक, मध्यम काळी तांबडी पोयट्याची जमिन योग्य ठरते. जांभ्या खडकाच्या जमिनीत पपईची झाडे उत्तम वाढतात. जमिनीचा सामु ६.५ ते ८.० असावा. चुनखडीचा व खडकाळ जमिनीत पपईची झाडे चांगली वाढत नाहीत. पपई झाडाच्या मुळांची खोली ४० से.मी. पर्यंत खोल जात असल्यामुळे जमिनीचा वरचा थर भुसभुसीत नंतरचा ४५ से.मी. ठिसुळ मुरमाचा असल्यास पपई पिकाला अनुकुल असते.


रोपे तयार करणे
ताजे बी वापरुन रोपे तयार करावीत. एक हेक्टर साठी २५० ते ३०० ग्रॅम बियाणे पुरेसे आहे. पॉलिथीनपिशवित तयार केलेल्या रोपांची वाढ चांगली होते. त्यासाठी १५० गेज च्या १८ x ३३ से. मी. च्या गोल बुड असलेल्या प्लास्टिक पिशव्या रोपे वाढविण्याकरिता वापराव्यात. प्रत्येक पिशवीत १ ते ३ बी लावुन ते चांगल्या कुजलेल्या कंपोस्टने झाकुन पाणी द्यावे. रोपे लागवडीयोग्य सुमारे ६ ते ७ आठवड्यांनी तयार होतात.

जाती
नर आणि मादी फुले वेगवेगळ्या झाडावर येणाऱ्या जाती वाशिंग्टन, को-५ को-६ पुसा ड्रॉफ, पुसा नन्हा, पुसा जांयट, त्याचप्रमाणे कुर्ग हनीड्यु, को-७ पुसा डेलिसियस, सनराईज सोलो, अर्का प्रभात ह्या उभयलिंगी आहेत. पेपेन साठी को – २, पुसा मॅजेस्टी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे.


लागवड पद्धत
लागवडी पूर्वी जमिनीची आडवी उभी नागरणी करावी. कुळव्याच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडुन घ्यावीत व जमिन सपाट करावी.२.२५४२.२५ मी.किंवा २.५० ४२.०० मी. अंतरावर लागवड करावी.

खत व्यवस्थापन
पपई लागवड करावयाच्या क्षेत्रात शेणखत अथवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी ४०-५० बैलगाड्या (२० मे.टन) जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर २००:२००:२०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येक झाडास लागवडीनंतर समान चार हप्त्यात पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या महिन्यात बांगडी पद्धतीने विभागुन द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
हिवाळ्यात साधारणपणे दर १० दिवसानी तर उन्हाळ्यात आठवड्यातुन एकदा पाणी द्यावे. दुरेही आळे पद्धती, सरी किंवा ठिंबक सिंचन यांचा वापर केला जातो.

33 फूट (10 मीटर) उंच असलेली विशाल आर्बोरोसेंट वनस्पती; साधारणपणे अल्पायुषी जरी 20 वर्षांपर्यंत जगू शकते; सुरुवातीला एकच खोड असते परंतु वयानुसार दुय्यम कोंब तयार होऊ शकतात. पपईच्या झाडांना दुय्यम वाढ होत नाही (म्हणजे लाकूड).


आंतरमशागत
बाग निंदून स्वच्छ ठेवावी. बागेची खादंणी दर दोन महिन्यांनी करावी. फुले आल्यावर १० टक्के नर झाडे ठेवुन बाकीची नर झाडे काढावीत. फळांची दाटी झाल्यास त्यांची विरळणी करावी. मुख्य खोडास येणारी वांझफुट लागलीच काढावी.

पपई लागवड करून मिळवा लाखोचा नफा. आधुनिक पद्धतीने करा पपईची लागवड.

Leave a Comment