राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय.

राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय.

राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय.

सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाले आहे. 

निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच प्रतापराव जाधव, संजय गायकवाड, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. यावेळी सर्वच नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिलासा देतांना पाहायला मिळत आहे. 

मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.

 तसेच, अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या. 

सध्या मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आंबा, लिंबू, केळीच्या बागा, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

 सध्या उन्हाळ्याच्या काळात अवकाळी पाववसाचा जोर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा पपंजाबराव डखांनी दिला आहे.  हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 18 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता डखांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात देखील 18 एप्रिलपर्यंत वातावरण बिघडलेले राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 18 एप्रिलपर्यंतच्या या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहतील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊसही होणार आहे. 

या कालावधीत बरसणारा पाऊस हा सर्वदूर होणार नाही, मात्र काही-काही भागात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. कांदा, हळद तसेच इत्यादी हार्वेस्टिंग झालेला शेतमाल झाकून ठेवावा अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

राज्यातील हवामानात मोठा बदल (Climate Chnage) होत असल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना चांगलाच फटका बसलाय. दरम्यान, अवकाळी पावसाचे वातावरण आणखी किती दिवस राहणार? राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय. राज्यात 18 एप्रिल पर्यंत म्हणजे पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असल्याची माहिती डख यांनी दिलीय. 

Leave a Comment