RTE  भरण्यासाठी अर्ज चालू झाली आहे तरी सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी व काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे व याचा फायदा घ्यावा. RTE form admission open for student filling form.

RTE  भरण्यासाठी अर्ज चालू झाली आहे तरी सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी व काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे व याचा फायदा घ्यावा. RTE form admission open for student filling form.

RTE  भरण्यासाठी अर्ज चालू झाली आहे तरी सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी व काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे व याचा फायदा घ्यावा.

दरवर्षी राज्यातील लाखो पालक आरटीईअंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. परंतु, यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक हवालदिल झाले होते. अखेर शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. बालकांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता.१६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. परंतु, राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, आता राज्यात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या सुरवातीला जाहीर केल्या होत्या. त्यात प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात, संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता पालकांना मंगळवारपासून (ता. १६) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकांना ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

-https://student.maharashtra.gov.in/adm_portal


ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

-https://student.maharashtra.gov.in/adm_portalऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

-https://student.maharashtra.gov.in/adm_portal

Leave a Comment