मका पिकावरील महत्त्वाचे रोग व कीड याविषयी सविस्तर माहिती व उपाय खाली दिलेल्या.   मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय.

मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय. पिकास उगवणीपासून काढणीपर्यंत प्रादुर्भाव करणाऱ्या निरनिराळ्या किडी म्हणजे अमेरिकन लष्करी अळी, खोडकिड, कणसे पोखरणारी अळी, गुलाबी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, करडे सोंडे आणि मावा होय. मका पिकावरील महत्वाच्या रोगांचा विचार केला तर टर्सिकम व मेडिस करपा, फुलोऱ्या पूर्वीचा खोड कुजव्या व तांबेरा असे विविध रोग आढळुन येतात.

मका पिकावरील महत्त्वाचे रोग व कीड याविषयी सविस्तर माहिती व उपाय खाली दिलेल्या. मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय.

1. अमेरिकन लष्करी अळी :

महाराष्ट्रात सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वप्रथम सोलापुर मधिल तांदुळवाडी या ठिकाणी या किडीची नोंद झाली. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर विविध पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला. हि कीड पिकांसाठी जास्त नुकसानकारक आहे. कारण किडीच्या मादीची प्रजनन क्षमता खुप जास्त आहे. एक मादी पतंग एका वेळी सरासरी १५०० ते २००० अंडी देवू शकते. ही कीड बहुभक्षी व खादाड असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर आपली उपजिविका साधु शकते. किडीचे पतंग एका रात्रीत १०० ते २०० कि.मी. पर्यंत प्रवास करु शकतात.

2.  खोडकीड : या किडीचे वैशिष्ट म्हणजे अळीच्या पाठीवर काळया ठिपक्यांचे पट्टे असून डोके गडद रंगाचे असते. नावाप्रमाणे या किडीचा नुकसानीचा प्रकार म्हणजे खोडाला आतुन पोखरने. किडीची अळीअवस्था नुकसानकारक आहे. पुर्ण वाढ झालेली अळी २.२ सें.मी. लांब धुरकट करडया रंगाची असून डोके काळे असते. मादी पतंग पानांच्या खालच्या बाजुला २ ते ३ रांगेत चपटया आकाराची ३०० अंडी देते. अंडी ५० ते १०० च्या समुहात असतात. अळी अवस्था १४ ते २८ दिवसांची असून त्यात ५ ते ६ वेळा कात टाकते. पुर्ण वाढ झालेली अळी खोडाला छिद्र पाडुन आत कोषात जाते. कोषातुन आठवड्याने प्रौढ बाहेर पडतो. अळी पानांना समान रेषेत छिद्र करुन खोडाच्या आतील भाग पोखरते. त्यामुळे पोंगा पुर्ण वाळतो. पिकाची रोपावस्था किडीला बळी पडणारी आहे. मका पिकाची उगवण झाल्यावर जवळपास चौथ्या आठवडयानंतर किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. सदर अळीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे १० टक्के झाडांच्या पानांवर गोल छिद्र किंवा ५ टक्के पोंगेमर आढळणे होय.

3. खोडमाशी : ही कीड घरमाशीसारखी पण आकाराने लहान असते. तिची लांबी ५ मि.मी असून रंग गडद असतो. अळी अवस्था फिक्कट पिवळया रंगाची असते. मादी माशी १५ ते २५ अंडी कोवळया पानांखाली किंवा खोडाच्या तळाशी घालते. अंडी उबवून अळी अवस्था ७ ते १० दिवसाची असते. पूर्ण वाढ झालेली अळी खोडात किंवा जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवडयाची असून कोषातून बाहेर पडलेली माशी ३-६ दिवस जगते. या किडीचा एकुण जीवनक्रम २१ ते २७ दिवसात पुर्ण होतो. मका पिकाची उगवण झाल्यानंतर चौथ्या आठवडयापर्यंत या किडीचा होतो. सुरुवातीला अळी पिकाची कोवळी पालवी खाते व हळूहळू पोंग्यात शिरुन पोंगेमर होते व त्याचा दुर्गध येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपांना बुंध्यापासुन नवीन फुट येते व किडीला बळी पडते. जुन्या झाडांमध्ये पाने खोडमाशीमुळे वेडीवाकडी होतात. सदर किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे १०% पोंगेमर होय. सदर किडीच्या व्यवस्थापनासाठी बियाण्याचे प्रमाण वाढवून प्रादुर्भावग्रस्त रोपे वेळीच उपटुन नष्ट करावीत.

4.  कणसे पोखरणारी अळी : या किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था म्हणजे केसर अवस्था होय. या किडीचे पतंग मध्यम आकाराचे मळकट पिवळे करडया रंगाचे असतात. या किडीची अळी हिरव्या असून ३८ ते ५० मी.मी. लांब असते. अळया कणसातील दाण्यांवर उपजीविका साधतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. एक मादी सुमारे ३५० अंडी घालून अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ होते. मादीपतंग बहुदा कणसाच्या स्त्रिकेसरवर अंडी घालतात. अळया जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था हवामानानुसार १० ते २५ दिवसांची असते. सदर अळीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला लहान अळया उचलुन नष्ट कराव्या. पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे. जैविक किड व्यवस्थापनामध्ये ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किडीची अंडी असलेले ८ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत. एच.ए.एन.पी.व्ही. २५० एल.ई. प्रती हेक्टरी वापरावे.

5.  गुलाबी अळी : पिकाच्या सर्वच अवस्थेत गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही अळी गुलाबी रंगाची असून डोके तपकिरी रंगाचे असते. सुरुवातीला अळी पानांवर लांब निमुळते छिद्र पाडते. कणीस भरण्याच्या अवस्थेत कणसातील दाणे खाते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेत नेहमी स्वच्छ ठेवावे. पक्षी थांबे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे वापरावेत. पुर्ण वाळलेली सुरळी उपटुन नष्ट करावी. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किटकांचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टर लालावेत तसेच ५ टक्के निंबोळी अर्क व गरज असल्यास रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी

मावा : मावा ही एक रसशोषक किड असून पानाच्या खालच्या बाजूला राहुन पानातील रस शोषण करते. त्यामुळे पाने सुकतात पिवळी पडतात व कडा वाळून पानाचा द्रोन सारखा आकार होतो. माव्याच्या शरीरातून चिकट द्रव पानावर सोडला जातो.

6. देठ कुजणे : या रोगामुळे झाडांचे देठ कुजण्यास सुरूवात होते. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी १५० ग्रॅम कॅप्टन १०० लिटर पाण्यात मिसळून मुळांना टाकणे गरजेचे आहे.

7.   तांबेरा : या संक्रमण झालेल्या झाडांची वाढ खुटते, झाडे पिवळी पडतात व मर झाल्याची लक्षणे दिसतात. हिरवी पाने आणि बारीक चमकदार जांभळ्या रंगाची फुले येणारी झाडे पिकाभोवती येतात. ही झाडे मका पिकावर परजीवी असून मुख्य पिकाची पोषके शोषून पिकाचा पिवळेपणा, पानांची मरगळ व झाडांची वाढ खुंटते. याच्या नियंत्रणासाठी पिकाला योग्य मात्रेत नत्रयुक्त खते दयावी. पिक फेरपालट करावी, पिकात जोम राहण्यासाठी पिकात शक्तिवर्धके वापरावे. शेणखताचा भरपूर वापर करावा. शेताच्या अवतीभोंवती नेपियर गवत लावल्यास स्ट्रांयगा गवताला पिकाच्या दूर ठेवता येते. संक्रमित शेतात काम केलेले सर्व शेत अवजारे स्वच्छ करावे. जेणेकरुन परत त्याद्वारे संक्रमण होणार नाही.

Leave a Comment