शेणखताला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांचा जास्त काल सेंद्रिय शेतीवर.


शेणखताला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांचा जास्त काल सेंद्रिय शेतीवर.

शेणखताला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांचा जास्त काल सेंद्रिय शेतीवर.

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारावी, याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत दीड हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये तशी जनजागृती करण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेतजमिनीची आरोग्य पत्रिका तयार करणे व त्यानुसार जमिनीला कोणते घटक आवश्‍यक आहेत, तीच मात्रा देण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध पिके घेतल्यानंतर शेतातून निघणारा पालापाचोळा आणि त्यात शेणखत टाकून त्याचे कंपोस्ट खत तयार करता येते.

गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात.

वापराने जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि विषमुक्त धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.

यांत्रिकीकरण, गाय, म्हैस, बैल, शेळ्या अशा पशुधनाच्या किमती वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे.

चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळेही शेणखताची मागणी वाढली आहे.

पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या चार हजार ते पाच हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत.

मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे. सोलापुरात एक ब्रास शेणखत तीन हजार रुपयांना विकले जात आहे.

यामुळे पूर्वी गावशिवारात सहज मिळणारे शेणखत आता अधिक दरात मिळत आहे.

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्यामुळे सद्यःस्थितीत सोनेरी दिवस आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारते. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे. तसेच मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. नुकत्याच पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून शेतजमिनीत शेणखताचे महत्त्व कृषी विभागाकडून अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment