हमखास फायदा मिळवून देणारे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान जरूर लागवड करावी तज्ञांचे मत.

हमखास फायद्याची शेती या पिकातून मिळते नगदी पिकामध्ये याचा समावेश शेतकऱ्यांनी जरूर याचा विचार करावा याची लागवड करावी म्हणून ओळखले जाते. 

हमखास फायदा मिळवून देणारे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान जरूर लागवड करावी तज्ञांचे मत.

चांगल्या निचरा असलेल्या जमिनीत सुपारी लागवड करावी. लागवडीसाठी १२ ते १८ महिने वयाच्या रोपांची निवड करावी. लागवडीसाठी श्रीवर्धनी रोठा, मंगला या जातींची निवड करावी. भरपूर पाऊस व आर्द्रता असलेल्या परिसरात सुपारी पीक चांगले येते. कमी पावसाच्या प्रदेशातही पाण्याची भरपूर व बारमाही सोय असल्यास याची लागवड करता येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तसेच समुद्रकाठावरील गाळाच्या जमिनीत पिकाची चांगली वाढ होते. डोंगर उतारावर जेथे पाण्याची सोय आहे, तेथेही या पिकाची लागवड करता येते.

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी.

या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो.

योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत.जगभरात सुपारीचं सर्वांत जास्त उत्पादन भारतात होतं. आकडेवारीनुसार, जगातलं 50 टक्के सुपारीचं उत्पादन भारतात होतं. पान-गुटख्यापासून ते धार्मिक विधींपर्यंतच्या अनेक गोष्टींत सुपारीचा वापर केला जातो. सुपारीच्या लागवडीसाठी चिकणमाती चांगली मानली जाते. असं असलं तरी सुपारीची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते.

सुपारीच्या रोपांची लागवड रोपवाटिकेच्‍या तंत्रानं केली जाते. म्हणजेच अगोदर बियांपासून रोपं तयार केली जातात. जेव्हा बियांपासून रोपं तयार होतात, तेव्हा त्यांची शेतात लागवड केली जाते. ज्या ठिकाणी सुपारीची झाडं लावली आहेत तिथे पाण्याचा प्रवाह आणि निचरा चांगला असला पाहिजे, जेणेकरून झाडांजवळ पाणी साचणार नाही. पाण्यासाठी छोटे चर बनवले जातात. सुपारीची लागवड जुलै महिन्यामध्ये करावी. सुपारीसाठी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केल्यास अधिक उपयोग होतो.

सुपारीची झाडं नारळासारखी 50 ते 60 फूट उंच वाढतात. लागवड केल्यानंतर सात ते आठ वर्षांत त्यापासून फळं मिळण्यास सुरुवात होते. एकदा लावलेल्या सुपारीच्या झाडापासून तुम्ही अनेक दशकं चांगली कमाई करू शकता. ज्या शेतात सुपारीची लागवड केली जाते त्या शेतात पाण्याचा निचरा होण्याची पूर्ण व्यवस्था असली पाहिजे. कारण शेतामध्ये काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते.

सध्याच्या काळात अनेक जण नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. व्यवसायातून नोकरीपेक्षा अधिक पैसा मिळवता येतो. शिवाय त्यात प्रगतीच्या अमर्याद शक्यता असतात, असा अनेकांचा विश्वास आहे. इतकंच नाही तर बिझनेसमध्ये व्यक्ती स्वत:चं डेली रूटीनही ठरवू शकते. त्यामुळे सध्या बिझनेसकडे अनेकांचा कल वाढताना दिसत आहे.

तुम्हीदेखील बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुपारीची शेती करू शकता. सुपारीच्या शेतीमध्ये कमी खर्चात चांगला नफा मिळवता येतो. या व्यवसायातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात स्पर्धा खूप कमी आहे.

सुपारीच्या झाडाला आलेली फळं तीन-चतुर्थांश पिकल्यानंतर तोडली जातात. बाजारात सुपारी चांगल्या किमतीत विकली जाते. एक किलो सुपारीसाठी साधारण 400 ते 700 रुपये प्रति किलो इतका दर मिळू शकतो. त्यामुळे एक एकर क्षेत्रात सुपारीची लागवड केली तर त्यातून भरघोस नफा मिळू शकतो. सुपारीच्या झाडांच्या संख्येनुसार यातून मिळणारा नफा लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एक झाड सुमारे 70 वर्षांपर्यंत उत्पन्न देऊ शकतं.

Leave a Comment