कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव. Market price of sugar cane , soyabean, onion.

कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव. Market price of sugar cane , soyabean, onion.

कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव.


शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या ऊस सोयाबीन व कांदा याला कवडीमोल भाव शेतकरी फार अडचणीत सापडले यामालाला कधी भाव मिळणार या चिंतेत शेतकरी पडलेला आहे .

ऊस सोयाबीन व कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते पण यावर्षी येणार डीपी काला कवडीमोल भाव व शेतकऱ्यांचा मुद्दे मालकी कमाई झाली नाही यामुळे शेतकरी फार निराश मनस्थितीत आहे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


19 एप्रिल ते 1 जून 2024 याकाळात देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी निवडणूक होणार आहे. सुमारे 97 कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करतील. यात सगळ्यात मोठा वाटा शेतकऱ्यांचा असेल. असं असलं तरी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना किती महत्त्व दिलं जातं हा खरा प्रश्न आहे

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत का सापडलाय?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत यावर बोलताना महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, “2023 च्या सुरुवातीपासून कांद्याचे भाव कमी होत गेले. हे भाव एवढे कमी झाले की कांदा उत्पादक संघटनेला 27 फेब्रुवारीला मोठं आंदोलन करावं लागलं.

त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला 350 रुपयांचं अनुदान दिलं. हे अनुदान 200 क्विंटलपर्यंत होतं. त्यानंतर जुलै महिना संपता संपता कांद्याच्या दरात किंचित वाढ होऊ लागली.

ऑगस्टमध्ये कांद्याला 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यानंतर केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2023 ला 40% निर्यातशुल्क लागू केलं आणि कांद्याचे भाव कमी झाले.

ऑक्टोबर महिन्यात पुन्हा भाव वाढू लागले आणि सरकारने एक नवीन नोटिफिकेशन काढून किमान निर्यात मूल्य 800 डॉलरवर नेले आणि परत दर नियंत्रित केले गेले.

डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झाला आणि सरकारने 7 डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लागू केली.

त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की ही निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत असेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली.

7 डिसेंबरला काढलेला आदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला 8 डिसेंबर उजाडलं आणि एका दिवसात शेतकऱ्याला मोठा फटका सहन करावा लागला.

उदाहरणार्थ निर्यातबंदी ज्या दिवशी लागू झाली त्यादिवशी 3000 ते 4000 रुपये भाव होता पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे भाव 2000 रुपये प्रतिक्विंटल एवढे झाले. “शेतकरी सन्मान निधीचे 6000 जास्त की 2,50,000 लाख जास्त?

भारत दिघोळे म्हणाले की, “आताचं सरकार शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये देतं. जर समजा माझ्याकडे 500 क्विंटल कांदा असेल आणि त्याचे मला 5 लाख रुपये मिळणार असतील तर निर्यातबंदीमुळे मला त्याचे अडीच लाख रुपयेच मिळाले. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही माझे अडीच लाख खाल्ले आणि दिले किती तर 6000. तर तुम्हीच सांगा 6000 जास्त की 2,50,000?”

ऊस उत्पादक शेतकरी संकटात का सापडलाय?

7 डिसेंबर 2023 ला इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली होती. सरकारच्या या निर्णयाला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण बंदी उठवून काही प्रमाणात इथेनॉल निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली.देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरेसा पुरवठा रहावा म्हणून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.देशातली संभाव्य साखर टंचाई टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं असलं तरी या निर्बंधांमुळे मागच्या काही महिन्यात देशातील साखर उद्योगाचं सुमारे तीन हजार कोटींचं नुकसान झालं आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एकूण अनुभव पाहता मागच्या काही वर्षांमध्ये इथेनॉल निर्मितीमुळे उसाची थकबाकी वेळेवर मिळण्यात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे.अर्थात कारखानदारांकडून इथेनॉलच्या निव्वळ उत्पन्नाच्या महसुलातून शेतकऱ्यांनी किती पैसे दिले जातात, याविषयी स्पष्ट माहिती दिली जात नाही, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं असलं तरी इथेनॉलमुळे साखर उत्पादकांना आणि अंतिमतः शेतकऱ्यांना फायदा झालाय, असं केंद्र सरकारच्या अहवालातच सांगण्यात आलंय.सोयाबीनचे भाव का पडलेत?

सामान्य नागरिकांना खाद्यतेल स्वस्तात मिळावं यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेल आयात केलं.त्यामुळे देशातील तेलाचे भाव कमी झाले पण याचा परिणाम शेतकऱ्याला या पिकांच्या मिळणाऱ्या मोबदल्यावरही झाला.सोयाबीन हे पारंपारीक पीक नसतानाही महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन का पिकवू लागला? याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर म्हणतात की, “मागच्या 20 वर्षांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातला शेतकरी सोयाबीन पिकवू लागला. आधी सूर्यफूल पिकवलं जायचं पण त्या पिकाला भाव मिळत नव्हता.त्यामुळे याला पर्याय म्हणून सोयाबीन आलं. त्याकाळात सूर्यफुलाची उत्पादकता चांगली होती, भाव चांगला मिळत होता. पण गेले दोन-तीन वर्ष झाले सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्याकडे कुणाचंही लक्ष नाही.कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव.

Leave a Comment