खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखापर्यंत कर्ज कसे मिळणार कुठे मिळणार जाणून घ्या योजना.


किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात

खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखापर्यंत कर्ज कसे मिळणार कुठे मिळणार जाणून घ्या योजना.

तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करा. – फॉर्म भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा.

KCC ची ऑफर व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण वित्तीय संस्था आणि राज्य सहकारी संस्थांनी केली आहे. KCC पशुपालन, मत्स्यपालन, शेती आणि इतर संबंधित पद्धतींमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांना ऑफर केले जाते . नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) ही योजना राबवते.

केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कायमचं नवनवीन योजना सुरू केल्या जातात. या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचे हित जोपासने हा असतो.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी त्यांची आर्थिक परिस्थिती सदृढ व्हावी यासाठी केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजना देखील शासनाने सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्टेट बँकेत किंवा इतर कोणत्याही बँकेत या योजनेअंतर्गत सहजतेने कर्ज मिळते. दरम्यान आज आपण या योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किसान क्रेडिट कार्ड योजना 

किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध होते. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल जात.

केसीसी अंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर सात टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु जर शेतकऱ्यांनी याची वेळेवर फेड केली तर त्यांना तीन टक्के व्याजदरात सवलत देखील दिली जाते. अर्थातच जर वेळेवर फेड केली तर अवघे चार टक्के व्याजदराने हे कर्ज शेतकऱ्यांना मिळतं.

किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्जदार शेतकऱ्याला ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागेल. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ. कोणताही एक पत्त्याचा पुरावा आवश्यक असेल. तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा पुरावा म्हणून सातबारा उतारा सादर करावा लागेल. 1.60 लाख रुपयापेक्षा अधिकचे कर्ज हवे असल्यास सुरक्षा दस्तऐवज देखील द्यावा लागतो.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कुठे करणार

किसान क्रेडिट कार्ड साठी बँकेत जाऊन अर्ज सादर करावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही बँकेत जाऊन यासाठी अर्ज सादर करता येतो. यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपणास केसीसी क्रेडिट कार्डचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तो अर्ज काळजीपूर्वक भरून बँकेत जमा करायचा आहे. अर्जासोबत कागदपत्रे देखील द्यावी लागतात.

Leave a Comment