जाणून घ्या संपूर्ण सोलार योजना व यामध्ये शेतकऱ्याचे फसवणूक कशी होईल याची काळजी घ्यावी.

Mahaurja kusum सावधान सोलार पंप योजना मध्ये तुमची फसवणूक होऊ शकते

Mahaurja kusum शेतकरी मित्रांनो सोलार पंपासाठी देशात महाराष्ट्र हे एक नंबरचे राज्य आहे. सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. सोलार पंप योजना हि महाराष्ट्रात (देशात) महाउर्जाच्या माध्यमातून राबवली जाते. तरी शेतकऱ्यांनी अर्ज करताना किंवा पेमेंट करताना कुठल्याही फेक वेबसाइट किंवा कोणत्याही नंबर वरुन आलेल्या काॅल ला बळी न पडता फक्त महाउर्जाचे meda ॲप्लिकेशन वरुन सेल्फ सर्वे करून नंतर पेमेंट करावे असे आवाहन महाउर्जा कडून करण्यात आले आहे.

जाणून घ्या संपूर्ण सोलार योजना व यामध्ये शेतकऱ्याचे फसवणूक कशी होईल याची काळजी घ्यावी.

Kusum solar scheme सध्या राज्यात सोलार पंप च्या माध्यमातून लोकांना फसवणारी टोळी सक्रिय झाली आहे. हे लोक शेतकऱ्यांना आपली सोलार साठी निवड झाली असल्याचा मेसेज करतात. आणि पेमेंट करायला सांगतात. शेतकरी सुद्धा आनंदाच्या भरात लगेच पेमेंट करतात आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलार पंपासाठी पेमेंट करताना आधी आपल्याला सेल्फ सर्वे करण्यासाठी सांगितले जाते व नंतर पेमेंट करायचे असते.

तुम्हाला सुध्दा सोलार पंपासाठी निवड झाली असा मेसेज आला असेल तर सर्वप्रथम महाउर्जाच्या संकेतस्थळावर जाऊन चेक करा तेथे जर आपल्याला आपला अर्जाची सोलार पंपासाठी निवड झाली असे दाखवले जात असल्यास महाउर्जाचे meda हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आधी सेल्फ सर्वे करा व नंतर पेमेंट करा. तुम्हाला जर फसवणूक होत असल्याची शंका असल्यास तुम्ही mahaurja.com या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा 02035004050 या नंबरवर संपर्क साधावा.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं, यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलार योजना आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं.

3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात.

पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला एकूण पंपाच्या किंमतीच्या 90 % एवढं अनुदान दिलं जातं.

पात्र अर्जदार अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला एकूण पंपाच्या किंमतीच्या 95 % अनुदान दिलं जातं

Leave a Comment