नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार लवकरच शेतकऱ्यांसाठी खुशखबर 👇👇👇


4’th instalment नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार….

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार….

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’ या योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देत आहे.

यासाठी दर 4 महिन्यांनी 2 हजारांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनं गेल्या अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवण्याचं जाहीर केलं.

त्यात केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील, असं सांगण्यात आलं.

पण, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नव्हती.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार लवकरच शेतकऱ्यांसाठी खुशखबर 👇👇

NSMNY updates 4’th instalment ; केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. पिएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबत वितरीत करण्यात आले होते. शेतकऱ्यांना पुढच्या हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तिन टप्प्यात दिले जातात. आतापर्यंत पिएम किसान योजनेचे 16 हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झाले आहे. आता शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची तसेच नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आतुरता लागली आहे.

पिएम किसान योजनेच्या निकषांनुसार इ केवायसी पुर्ण असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. इ केवायसी किंवा इतर काही त्रुटी असल्यास या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2019 पुर्वी जमीन नावावर असने बंधनकारक आहे. 2019 नंतर जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता सोबतच वितरित होणार असून हे दोन्ही हप्ते जुन च्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही योजनेचे पैसे 4000 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती माध्यमातून वर्तवली जात आहे..

Leave a Comment