यावर्षी कापूस लागवड करताना मंग जरूर वाचा हा लेख माझ्या सर्व शेतकरी बांधवांना जरूर उपयोगी पडेल.

यावर्षी कापूस लागवड करताना मंग जरूर वाचा हा लेख माझ्या सर्व शेतकरी बांधवांना जरूर उपयोगी पडेल.

यावर्षी कापूस लागवड करताना मंग जरूर वाचा हा लेख माझ्या सर्व शेतकरी बांधवांना जरूर उपयोगी पडेल.

मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही बरेच शेतकरी कापूस लागवड करतील तर त्यांच्यासाठी उपयोगी माहिती खाली दिली आहे मी अशी आशा करतो की माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती उपयोगी पडेल सविस्तर लेख वाचून याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती.

कापूस उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स ; कापूस लागवड संपूर्ण माहिती.

कापूस उत्पादन

कापूस उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स ; कापूस लागवड संपूर्ण नियोजन

कापूस उत्पादन वाढीच्या टिप्स ; शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस हे महत्वाचे नगदी पिक आहे. पावसाच्या पाण्यावर आणि दुष्काळी जिल्ह्यात कापूस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कापसाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी पुर्वतयारी तसेच एकात्मिक संपूर्ण नियोजन कसे असावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कापूस लागवडीसाठी महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत..

1) आपल्या जमीनीच्या प्रतवारीनुसार कापूस लागवडीचे योग्य अंतर.

2) कोरडवाहू किंवा बागायती साठी योग्य वानाची निवड.

3) पूर्वमशागत करताना शेनखत तसेच लागवडीनंतर रासायनिक खताचे नियोजन..

4) वेळेवर फवारणी नियोजन

5) तन नियंत्रण (तणनाशकाचा वापर)

कापूस लागवडीसाठी योग्य अंतर

कापसाचे उत्पन्न हे आपल्या झाडाच्या संख्येवर आणि बोंडाच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या जमीनिनुसार कापूस लागवडीसाठी अंतर निवडले पाहिजे. अंतर निवडताना पिकात दाटी होणार नाही तसेच मोकळी जागा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिकात दाटी झाल्यास पातेगळ जास्त होते त्यामुळे पिकात हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी…

योग्य वाणांची निवड

कापूस लागवडीसाठी वाणाची निवड करताना आपला मागिल वर्षीचा अनुभव तसेच आपल्या मित्र शेतकऱ्यांचा अनुभव एकत्रित करून वाणाची निवड करावी. दोन बॅग पेक्षा अधिक लागवड करत असाल तर एकाच वाणाची निवड करु नये वेगवेगळ्या वाणाची निवड करावी…

कापसाचे टाॅप 10 वाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

कापूस खत व्यवस्थापन कसे असावे..

कापूस पिकासाठी खताचे योग्य नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते. लागवडीनंतर 15 दिवसानंतर पुढे दोन तीन वेळा खत द्यावे तसेच खत देण्याआधी पावसाचे आणि पिकाची परिस्थिती लक्षात घ्यावी. कापूस पिकासाठी नत्र स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच कॅल्शियम, गंधक, मॅग्नेशियम, लोह, झिंक, तांबे, मॅगनीज, बोरॉन यासारख्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. तसेच काही अन्नद्रव्याचा वापर फवारणी मध्ये सुद्धा करावा. कापूस पिकासाठी संपूर्ण खत व्यवस्थापन कसे असावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

कापूस पिकासाठी पहिला/दुसरा/तीसरा/चौथा/पाचवा डोज कोनता आणि किती द्यावा याबाबत सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा..

कापूस फवारणी नियोजन

लागवडीपासून ते चांगली फळधारणा होईपर्यत स्टेप नुसार कापसावर रोग किडीचा प्रादुर्भाव होत असतो. पिकावरील रोग किड पाहुन वेळेवर फवारणी करणे आवश्यक असते.. फवारणी करताना तज्ञाची माहिती घेऊन फवारणी करावी.

कापूस तन नियंत्रण

कापूस लागवड केल्यानंतर 72 तासामध्ये तण उगवण्यापूर्वी, खालीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी केल्यास गवत उगत नाही.

1) पेंडिमेथॅलिन 30% ईसी- 1000मिली/एकर

2) पेंडिमेथॅलिन 38.7% सीएस- 700मिली/एकर

कापसाच्या उभ्या पिकात पाइरिथियोबैक सोडियम 6% + क्विज़ालोफॉप एथिल 4% घटक आसलेल्या तननाशकाची 400 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करू शकता.

तननाशके फवारणी आगोदर तननाशकावरील माहिती सविस्तर वाचा किंवा दुकानदार किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कापसामधिल तन नियंत्रण करताना खुरपणी बैलपाळ्या या पारंपारिक पद्धतीने तन नियंत्रण केल्यास अधिक चांगले आहे. या पद्धतीने तन नियंत्रण केल्यास पिकावर कोणतेही दुष्परिणाम दिसत नाही…

कापूस पिकासाठी पहिला/दुसरा/तीसरा/चौथा/पाचवा डोज कोनता आणि किती द्यावा याबाबत सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा..

Leave a Comment