कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत पण महाराष्ट्राच काय जाणून घ्या सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी उपयोगी.

Drought conditions : दुष्काळी कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत महाराष्ट्राला काय पहा सविस्तर

 दुष्काळी कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत महाराष्ट्राला काय पहा सविस्तर.

कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत पण महाराष्ट्राच काय जाणून घ्या सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी उपयोगी.

केंद्र सरकारने कर्नाटकसाठी ३,४९९ कोटी रुपयांचा दुष्काळ निधी मंजूर केला आहे आणि त्यापैकी केवळ ३,४५४ कोटी रुपये जारी केले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

केंद्र सरकारने कर्नाटकसाठी ३,४९९ कोटी रुपयांचा दुष्काळ निधी मंजूर केला आहे आणि त्यापैकी केवळ ३,४५४ कोटी रुपये जारी केले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. निधीची उर्वरित रक्कमही शक्य तितक्या लवकर द्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

केंद्राने मंजूर केलेली रक्कम राज्य सरकारच्या मागणीच्या एक-चतुर्थाशही नसल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. त्याचबरोबर केंद्र सरकराला इशारा दिल्याबद्दल आणि राज्य सरकारला थोडी दुष्काळ मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. कर्नाटकच्या जनतेचा अधिकार मिळवण्यासाठी आपण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये निदर्शने केली होती याचीही आठवण त्यांनी करून दिली.

Drought conditions : मागील वर्षी (2023) मध्ये पावसात मोठ्या प्रमाणावर खंड पडल्याने महाराष्ट्राप्रमाणेच इतर ठिकाणी सुद्धा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच भिषण दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडे 18 हजार कोटींची मदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून 3500 हजार कोटींची मदत मंजूर केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.

आपल्या महाराष्ट्रात कर्नाटक पेक्षाही कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात आले पाहणी झाल्यावर केंद्रीय पथकाने खरोखरच भिषण दुष्काळ असल्याची कबुली दिली. मात्र अद्याप केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी कोणत्याही मदतीची घोषणा केली नाही. केंद्राने लवकर मोठ्या भरीव मदतीची घोषणा करून निधीची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे.

केंद्रातील सरकार राज्यात आहे तरीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे या मदतीचे वितरण सध्या सुरू आहे. दुष्काळी मदतीचे वितरण हे DBT च्या माध्यमातून होत आहे. DBT portal मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या अनुदानाचे पैसे येण्यासाठी उशीर झाला आहे.

तुमच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असल्यास आपल्या तलाठ्याकडे संपर्क साधुन व्हिके नंबर घेऊन महा ई सेवा केंद्रात जाऊन ई केवायसी पुर्ण करावी. ई केवायसी पुर्ण केल्यानंतर या दुष्काळी अनुदानाचे पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात जमा होतील.

Leave a Comment