कापूस उत्पादन  वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स…शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती.

कापूस उत्पादन कमी येण्याचे कारण ; उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स…

कापूस उत्पादन  वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स…शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती.

कापूस उत्पादन कमी

कापूस उत्पादन कमी येण्याचे कारण ; उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स…

कापूस उत्पादक आपल्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात घेतले जाते. कमी अधिक पावसावर येणारे कोरडवाहू बागायती पिक असल्याने मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करतात. कापूस पिकाच्या वाढत्या खर्चामुळे तसेच कापसाला मिळणाऱ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना कापूस पिक परवडत नाही. तसेच काही शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन अतिशय कमी येते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पादन खर्च सारखाच होत आहे. यंदाच्या हंगामात कापसाचे चांगले उत्पादन कसे घ्यावे तसेच कापसाचे उत्पादन कमी येण्याचे कारणे समजून घेऊया…

राज्यातील कापूस उत्पादकता ही ३०६ किलो रुई प्रति हेक्टरी एवढीच आहे. उत्पादकता कमी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांश लागवड कोरडवाहू आणि पावसावर अवलंबून आहे. लागवड पावसावर अवलंबून असल्याने पेरणी योग्य वेळेवर करता येणे शक्य होत नाही. कापसाची लागवड जसजशी उशिरा होईल तशी उत्पादनात घट येते.

कापूस लागवड हलक्या जमिनीत करतात. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याचे कारण म्हणजे सिंचनाचा अभाव, असंतुलित पोषण, एकरी झाडांची कमी संख्या, उशिरा लागवड, हलक्या जमिनीत लागवड, पीक संरक्षणाकडील दुर्लक्ष. पाटपाणी पद्धतीमुळे पाण्याचा वापर भरपूर होऊन जमिनीत कायम वाफसा राहात नाही.

जमिनीतील कमी, जादा ओलाव्यामुळे पात्या, फुले, बोंडांची गळ मोठ्या प्रमाणावर होत असते. बोंड वाढण्याच्या अवस्थेत पुरेसा ओलावा, पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध नसल्यामुळे बोंडांचे वजन कमी भरते.

1) उशीरा लागवड ; आपल्या महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसावर कापसाची लागवड केली जाते. उशीरा लागवड झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत असते. तसेच कमी अधिक पर्जन्यमान झाल्याने कापूस उत्पादनात घट होते.

2) पिकात दाटी ; पिकात दाटी झाल्याने आणि बोंड लागण्याच्या वेळी सतत पाऊस पडत राहिल्याने पातेफुलाला योग्य हवा लागत नाही त्यामुळे पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते परीणामी कापूस उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे पिकात दाटी होणार नाही असे योग्य अंतरावर कापसाची लागवड करावी म्हणजे पिकात हवा खेळती राहिल व पातेगळ यासारख्या समस्या पिकात निर्माण होणार नाही.

3) वाणाची निवड ; दरवर्षी बाजारात नवनवीन वाण उपलब्ध होतात, कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते आणि शेतकरी जाहिरातीला आकर्षीत होऊन बियाणे खरेदी करतात. त्यामुळे काही वेळा बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या हाती पडल्यावर पिकावर रोग येणे बोंडे कमी व लहान पडणे बोंडावर किड येणे हे प्रकार होतात त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे निवडताना मागिल वर्षीचा अनुभव तसेच इतर शेतकऱ्यांचा सल्ला यानुसार तज्ञांच्या सल्ल्याने बियाण्याची निवड करावी..

4) तन-नियंत्रण ; पिकाच्या उत्पादनात घट येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वेळेवर तन-नियंत्रण न होणे. अनेकदा शेतकऱ्यांना वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाही किंवा सतत पाऊस सुरू राहिल्याने मशागत करता येत नाही त्यामुळे तन-नियंत्रण वेळेवर होत नाही. तन-नियंत्रण वेळेवर झाले नाही तर पिक पिवळे पडते वाढ योग्य होत नाही एकंदरीत पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतात त्यामुळे तन-नियंत्रण वेळेवर करणे अतिशय महत्त्वाचे आहे..

5) खताचा अयोग्य वापर ; पिकात खताचे योग्य नियोजन असने खुप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांने माती परीक्षण करून खतांची निवड करणे आवश्यक आहे. सुक्ष्म अन्नद्रव्ये तसेच मुख्य अन्नद्रव्यांचेअन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्यक असते.

वरील कारणांबरोबर कमी अधिक प्रमाणात पाऊस , पाणी साचणारी जमीन चोपण चुनखडी युक्त जमीन तसेच अतिशय खडकाळ हलक्या जमिनीत कापसाचे उत्पादन कमी येते. उत्पादन वाढीसाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आणि टिप्स तसेच तज्ञांची माहिती वेळोवेळी आपल्या ग्रुपवर देत राहु शेतीविषयक नवनवीन माहिती साठी आपल्या 

त्यामुळे पिकात दाटी होणार नाही असे योग्य अंतरावर कापसाची लागवड करावी म्हणजे पिकात हवा खेळती राहिल व पातेगळ यासारख्या समस्या पिकात निर्माण होणार नाही.  वाणाची निवड ; दरवर्षी बाजारात नवनवीन वाण उपलब्ध होतात, कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते आणि शेतकरी जाहिरातीला आकर्षीत होऊन बियाणे खरेदी करतात

Leave a Comment