शेतकऱ्यांसाठी खुशखबर पहा सविस्तर माहिती Mjfsky 50 हजार प्रोत्साहन.

Mjfsky 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी येणार का ? 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर पहा सविस्तर माहिती Mjfsky 50 हजार प्रोत्साहन.

Mjfsky 50 हजार प्रोत्साहन

Mjfsky 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी येणार का ? Lone scheme maharashtra

Mjfsky नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये चार ते पाच याद्या जाहीर करून ईकेवायसी करून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रूपयाचे वितरण करण्यात आले आहे. आणि ईकेवायसी करून अद्याप भरपूर शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. आणि या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अजून या 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. (Maharashtra winner session 2023)

हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरादरम्यान याबाबत प्रश्न उपस्थित केला असता यावर उत्तर देण्यात आले आहे. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित झाले आणि किती शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे तसेच यापुढे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची नवीन यादी येणार का याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. प्रोत्साहन अनुदानाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Lone scheme maharashtra government)

दि. 14/12/2023 रोजी हिवाळी अधिवेशनात दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रोत्साहन अनुदानासाठी एकुण 15 लाख 44 हजार शेतकऱ्यांची कर्जखाती हि अनुदानासाठी पात्र झाली आहे. त्यापैकी 15 लाख 18 हजार शेतकऱ्यांनी आपली (E-kyc) ईकेवायसी पुर्ण केली आहे. या ई केवायसी पुर्ण केलेल्या 14 लाख 30 हजार शेतकऱ्यांसाठी 5180 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आणि 11220 शेतकऱ्यांना 42 कोटी 30 लाख रुपयांचा लाभ वितरीत होणे बाकी आहे. अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात दिली आहे.

यापुढे आता 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची नवीन यादी येणार नाही असे स्पष्ट झाले आहे. आता फक्त 11220 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचे वाटप होईल अशी माहिती हिवाळी अधिवेशनात दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

****यांना लाभ मिळणार नाही*******

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.

महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.

केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).

कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

Leave a Comment