हवामान अंदाज कधी पडणार पाऊस. यावर्षी भरपूर पाऊस शेतकरी आनंदात.

हवामान अंदाज कधी पडणार पाऊस. यावर्षी भरपूर पाऊस शेतकरी आनंदात.

हवामान विभागाने आज आणि उद्या पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर गुजरात, कोकण आणि गोव्यासह देशभरात उष्ण तापमानासह उकाडा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.

तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला.

देशात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. तर आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे सर्वाधिक ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला आहे.

हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहील तसेच उकाडाही जाणवेल असा अंदाज दिला. तर सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला.

हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला.

Leave a Comment