कृषीमंत्री धनंजय मुंडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा…

कृषीमंत्री धनंजय मुंडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा…

कृषीमंत्री धनंजय मुंडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा…

कृषीमंत्री धनंजय मुंडे
कृषीमंत्री धनंजय मुंडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा…कृषीमंत्री धनंजय मुंडे ; सध्या लोकसभा निवडुकीचा कार्यक्रम सुरू आहे. विरोधकांनी सोयाबीन दरवाढीचा मुद्दा चांगला लावुन धरला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे दर खुप घसरलेले आहेत. मागील सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडुन आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी लातूर येथे प्रचारसभेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे.

हे वाचा – रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ (शेतकऱ्यांना मोठा फटका) पहा नवीन दर
धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत सोयाबीन दरवाढीचा मुद्द्यांवरुन आवाज उठवला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी घोषणा केली आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. आचारसंहिता लागू असताना सरकारला कोणतीही घोषणा करता येत नाही पण मुंडे थेट घोषणा करत हेक्टरी 5000 रूपये कधी मिळणार याची तारिख सांगितली आहे.


सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5000 रुपये देणार असल्याची घोषणाच कृषीमंत्री धनंजय मुंडें यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे 12/जुन पर्यंत जमा केले जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी लातूर मध्ये प्रचारसभेत दिली आहे. खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली आहे.

Leave a Comment