पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या…

पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या…

पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या…

पिककर्जाचे पुर्नगठन
पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या…
पिककर्जाचे पुर्नगठन ; यावर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ तर 1021 महसूल मंडळात दुष्काळ सदृश परीस्थिती जाहीर केली आहे. आणि या 40 तालुक्यातील तसेच 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देत या शेतकऱ्यांचे पिककर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी बँकाना सांगितले आहे.

पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय ?

पिककर्ज पुर्नगठन : पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार याबाबत भरपूर शेतकऱ्यांकडून विचारणा केली जाते. पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे कर्जमाफी होणार का या भ्रमात अनेक शेतकरी असतात. तरी पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेऊया.

सरकारकडून विविध बॅकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप केले जाते. या कर्जासाठी कमी व्याजदर आकारला जातो. अनेकदा शेतकरी आपले पिककर्ज भरण्यासाठी सक्षम नसतात तेव्हा सरकारकडून पिककर्जाचे पुर्नगठन केले जाते. जुने कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून अल्पमुदत कर्ज मध्यम किंवा दीर्घ मुदत कर्जात रुपांतरीत केले जाते . त्याला ठरावीक हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची परवानगी दिली जाते त्याला पिककर्जाचं पुनर्गठण म्हणतात.एकंदरीत कर्जाचे पुर्नगठन म्हणजे शेतकऱ्यांना आपले पिककर्जची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ दिली जाते.

पिककर्जाचे पुर्नगठनाचे फायदे तोटे काय?

कर्जाचे पुनर्गठन झाल्यावर शेतकऱ्यांना जुने कर्ज थकित असताना नवीन पिककर्ज उपलब्ध होते. आणि थकित कर्जाचे बँकेने ठरवल्याप्रमाणे हप्त्यांमध्ये या कर्जाची परतफेड करावी लागते. तसेच पुढील वर्षी नवीन पिककर्ज घेतलेल्या कर्जाची आणि थकित पिककर्जाची या दोन्ही पिककर्जाचे परतफेड करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक ताण पडतो.

Leave a Comment