नवीन नियम व अटी E-Pik pahani ई-पिक पाहणी मध्ये मोठे बदल ; नवीन बदल जाणून घ्या..

E-Pik pahani ई-पिक पाहणी मध्ये मोठे बदल ; नवीन बदल जाणून घ्या..

E-Pik pahani 

नवीन नियम व अटी E-Pik pahani ई-पिक पाहणी मध्ये मोठे बदल ; नवीन बदल जाणून घ्या..

E-Pik pahani ई-पिक पाहणी मध्ये मोठे बदल ; नवीन बदल जाणून घ्या…

E-Pik pahani आपल्या पिकाची नोंद 7/12 वर करण्यासाठी मागिल दोन वर्षापासून ई-पिक पाहणी या मोबाईल ॲपलीकेशन चा वापर केला जात आहे. मात्र येत्या हंगामापासून ई-पिक पाहणी हि आपल्याला घरी बसुन करता येणार नाही. खोट्या नोंदी आढळल्याने राज्य सरकारने घरबसल्या ई-पिक पाहणी करण्याची सुविधा रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्यक्ष शेतात 50 मिटर आत गेल्याशिवाय ई-पिक पाहणी ची नोंद होणार नाही अशी माहिती महसूल विभागाकडुन देण्यात आली आहे.

ई-पिक पाहणीच्या कामासाठी प्रत्येक गावात पाहणी सहाय्यक नेमणार…

सरकारकडून वारंवार सांगुन सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे किंवा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे शेतकऱ्यांकडून ई-पिक पाहणी साठी प्रतीसाद मिळत नाही. त्यामुळे आता सरकारकडून प्रत्येक गावात एक पाहणी सहाय्यक नेमनार असुन तलाठ्याच्या अखत्यारीत ई-पिक पाहणी ची कामे तलाठ्याऐवजी खाजगी सहाय्यक करतील..

ई-पिक पाहणीच्या कामात कोणते बदल होणार ?

1) मोबाईल द्वारे कोणत्याही ठिकाणाहून ई-पिक पाहणी करण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद होणार..

2) थेट शेतात मध्ये 50 मिटर आत गेल्याशिवाय ई-पिक पाहणी करता येणार नाही.

3) प्रत्यक्ष शेताच्या आत 50 मिटर गेल्यानंतर पिकाचा फोटो अपलोड होईल.

4) तलाठी स्तरावर ई-पिक पाहणीत फोटो काढावे लागणार.

5) ई-पिक पाहणीचे कामे तलाठ्याऐवजी खाजगी सहाय्यक करतील.

सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामातील ई-पिक पाहणी साठी 15 फेब्रुवारी पर्यंत कालावधी शिल्लक आहे या दरम्यान शेतकऱ्यांना आपली ई-पिक पाहणी पुर्ण करता येईल. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत फक्त तलाठी ई-पिक पाहणी करतील. पुढील हंगामातील ई-पिक पाहणी 15/ जुलै नंतर सुरू होण्याची शक्यता

Leave a Comment