पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज…

पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज…

पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज…

Today live havaman aandaj
Today live havaman aandaj पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज…

Today live havaman aandaj ; हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वारे वाहतील तसेच विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट होईल अशी माहिती हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

आज दि. 10/मे रोजी जिल्हानिहाय हवामान अंदाज (IMD)

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, छ.संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे तर जालना, परभणी या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्यमहाराष्ट्र ; नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात विजांसह वादळी पाऊस तर कोल्हापूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात हालक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

विदर्भ – वाशीम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पुर्वमोसमी पाऊस पडत आहे. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात पुर्वमोसमी पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/S5G2KHFEzX

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 10, 2024

Leave a Comment