महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू…

महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू…

महाडीबीटी पोर्टल

महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू…

महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू…

Biyane Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहे. mahadbt biyane anudan yojana हे बियाणे कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनामार्फत बियाणे वाटप हे जून मध्ये केले जाते आणि रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान केले जाते. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बियाणे वाटप होण्याआधी एक महिना सुरुवात होते.

हे बियाणे गळीत आणि अन्नधान्य पिकासाठी असते. पण हे बियाणे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे दिले जाते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईटवर Maha DBT या पोर्टलवर भरावे लागते. mahadbt biyane anudan yojana अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या आत हे बियाणे कृषी विभागामार्फत दिले जाते.

महाडीबीटी पोर्टल ; कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते. बियाणे अनुदान 2024 साठी अर्ज सुरू झाले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. बियाण्यासाठी अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया..

कृषी विभागामार्फत बियाणे घटक मध्ये बियाणे वितरण आणि पिक प्रात्यक्षिक या दोन घटकांसाठी अर्ज स्विकारले जातात. यामध्ये प्रमाणीत बियाण्यामध्ये निवड झाल्यावर 50% अनुदानावर बियाणे दिले जाते. तसेच पिक प्रात्यक्षिक मध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या पिकाचे एक एकर साठी नवीन वाण मोफत दिले जाते.

Leave a Comment