सोयाबीन पेरणीसाठी महत्त्वाच्या सूचना जरूर वापर जर बियाणे तुमच्या घरचे असेल तर.

सोयाबीन पेरणीसाठी महत्त्वाच्या सूचना जरूर वापर जर बियाणे तुमच्या घरचे असेल तर.

Soyabin farming सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय तर हि काळजी घ्या..

Soyabin farming
Soyabin farming सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय तर हि काळजी घ्या..

Soyabin farming ; हवामान विभागाकडून मान्सूनच्या आगमनाची तारिख जाहीर करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांच्या पूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. यंदा हवामान खात्याने चांगल्या मान्सूनचे अंदाज वर्तवले असल्याने निश्चितच यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. पेरणीचा हंगाम जवळ आला असून सोयाबीन बियाणे कंपन्यांनी बियाण्याच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी घरचे बियाणे वापरणार आहेत. पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अतिशय आवश्यक असते. उगवण क्षमता तपासणी केल्यानंतर एका एकरासाठी किती बियाणे पेरावे हे लक्षात येते..
सोयाबीन च्या बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी ?

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी 100 सोयाबीनचे दाणे 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर ते बियाणे बाहेर काढून त्या बियाण्याचे निरिक्षण करावे. यामध्ये सुरकुत्या पडलेले बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे. साधारणतः 100 पैकी 70 बियाण्यास सुरकुत्या पडल्या असतील तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. उगवण क्षमता तपासणीसाठी दुसरी पद्धत म्हणजे 100 बियाण्याची एका पोत्यावर पेरणी करावी. वेळोवेळी पाणी टाकून तीन चार दिवसांनंतर त्यापैकी किती बियाणे अंकुरते यावरून आपले बियाणे पेरणीसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवावे.


कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार बियाण्याची 70 % उगवण क्षमता असेल तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. बियाण्याची उगवण क्षमता कमी असेल तर बियाणांचे पेरणीसाठी प्रमाण वाढवावे. अन्यथा चांगली उगवण क्षमता झाली नाही तर उत्पादनात घट होते. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बियाण्याची उगवण क्षमतेनुसार बियाण्याचे प्रमाण किती असावे याबाबत माहिती पाहुया…


1) बियाण्याची उगवण क्षमता 75 ते 80 % असल्यास बियाण्याचे प्रमाण 10 ते 15 % एवढे वाढवावे..


2) बियाण्याची उगवण क्षमता 70 ते 75 % एवढी असल्यास बियाण्याचे प्रमाण 15 ते 20 % एवढे वाढवावे..

3) बियाण्याची उगवण क्षमता 65 ते 70 % एवढी असल्यास बियाण्याचे प्रमाण 20 ते 25 % एवढे वाढवावे..


4) बियाण्याची उगवण क्षमता 60 ते 65 % एवढी असल्यास बियाण्याचे प्रमाण 25 ते 30 % एवढे वाढवावे.

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून नंतर आपल्याला एकरी किती बियाण्याची आवश्यकता आहे हे ठरवावे. उगवण चांगली झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होते. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या

Leave a Comment