टोमॅटोच्या दरात घसरण. शेतकरी सापडले अडचणीत.


टोमॅटोच्या दरात घसरण, बटाट्याच्या दरात वाढ

टोमॅटोच्या दरात घसरण. शेतकरी सापडले अडचणीत.

दरम्यान, एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे बटाट्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. गेल्या 30 दिवसांत बटाट्याच्या दरात 12 टक्क्यांची वाढ झालीय. वर्षभराच्या तुलनेत बटाट्याच्या दरात सुमारे 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवामान आणि तापमानातील बदल पाहता येत्या काही महिन्यांत बटाटे आणि इतर काही भाज्यांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतिकिलो टोमॅटोला मिळतोय 5 ते 15 रुपयांचा दर

आझादपूर टोमॅटो असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानसारख्या राज्यातून टोमॅटोची आवक चांगली झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर घाऊक बाजारात टोमॅटोचे घाऊक दर सुमारे 5 ते 15 रुपये प्रतिकिलो आहेत. या मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

 सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Price) अडचणीत सापडले आहेत. कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालीय. जवळपास टोमॅटोच्या दरात 40 टक्क्यांची घसरण झालीय. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसतोय. त्यामुळं चांगला दर न मिळाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. टोमॅटोच्या दरात नेमकी का घसरण होत आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

मागणी वाढली तरी दर वाढत नाहीत

सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण दरात घसरण होत आहे. एका बाजूला देशात तापमानात वाढ होत आहे. त्यामुळं टोमॅटोच्या मागणीत वाढ होत आहे. मागणी वाढली तरी दर मात्र वाढत नसल्याचे दिसत आहे. दरात घसरणच होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक राज्यातून टोमॅटोची आवक होत असल्याचं दिसत आहे. आवक वाढल्यामुळं दरात घसरण झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. 

नेमका किती मिळतोय दर?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या दरात 40 टक्क्यांची घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशात टोमॅटोचा प्रति क्विंटल किमान भाव 1600 रुपयापर्यंत इतका खाली आला आहे. तर दिल्लीत 800 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. दर घसरल्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दिल्लीच्या बाजारात हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये टोमॅटोच्या दरात 40 टक्क्यांची घसरण झाली आहे.  

Leave a Comment