महाराष्ट्रात चक्रीवादळ कधी येणार व कधी पाऊस पडणार याबद्दल सविस्तर माहिती.

Cyclone updates बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर काय परिणाम होणार पंजाबराव डख

Cyclone updates बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर काय परिणाम होणार पंजाबराव डख

Cyclone updates

Cyclone updates बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर काय परिणाम होणार पंजाबराव डख…

Cyclone updates ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 18/ मे रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. नवीन दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अवकाळी पावसाचे सावट कमी होणार आहे. आणखी दोन दिवस म्हणजे 21/मे पर्यंत किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात हलक्या मध्यम सरी बरसतील असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (Havaman aandaj)

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत आहे हे चक्रीवादळ कलकत्त्याकडे जाणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्रात 27 ते 28 मे दरम्यान पाऊस होऊ शकतो. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाने आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल ,तामिळनाडू या राज्यात पावसाची शक्यता अधिक राहिल. (Cyclone updates)

Low pressure area likely to form ovr SW Bay of Bengal BoB arnd 22 May.Concentrate in depression ovr central parts of BoB arnd 24 May

22 मे: नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता.

24 मे: ते मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात तीव्र (डिप्रेशन) होण्याची शक्यता

IMD pic.twitter.com/hbv1b7ZOHN

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 18, 2024

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. तसेच 18/मे पासून राज्यातील अवकाळी पावसाचे सावट कमी झाले आहे. अवकाळी पाऊस फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक, कोकण किनारपट्टी या भागात विखुरलेल्या स्वरुपात होईल उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहिल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. (Panjab dakh havaman aandaj)

Leave a Comment