Pm kisan news पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे

Pm kisan news पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे

Pm kisan news  पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे

Pm kisan news  पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे…


Pm kisan पिएम किसान योजनेचा नवीन GR दि. 17/मे/2024 रोजी राज्य सरकार ने घेतला आहे. या नवीन GR ची माहिती या लेखात समजावून घेऊया. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी आयुक्त स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षा च्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडीया, पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत. (Pm kisan yojna)(पिएम किसान योजनेचा नवीन GR जिआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


कृषि आयुक्तालयाने सदर योजनेंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयासाठी जिल्हास्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त, कृषि यांचे स्तरावर सदर योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदर प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. (Pm kisan news 2024)

(पिएम किसान योजनेचा नवीन GR जिआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


पिएम किसान योजनेचा नवीन जिआर मध्ये कृषी आयुक्ताला जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाही किंवा योजनेत इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

Leave a Comment