प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सहा हजार रुपये. कसा करायचा अर्ज संपूर्ण माहिती.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते. दोन हजारांच्या तीन टप्प्यात ही मदत देण्यात येते. त्यासाठी अशी आहे नोंदणी प्रक्रिया

प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सहा हजार रुपये. कसा करायचा अर्ज संपूर्ण माहिती.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु करण्यात आली. आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये वार्षिक जमा होतात.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी लागेल. पोर्टल उघडताच तुम्हाला Farmer Corner मध्ये नवीन नाव नोंदणी हा पर्याय दिसेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सोपी आहे. आतापर्यंत 16 हप्ते जमा झाले आहे. तर शेतकरी 17 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहे. एका अंदाजानुसार, पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

आता आणखी एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती, तपशील नोंदवा. ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर एक कॅप्चा कोड दिसेल. तो नोंदवा.

आता OTP बटणवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो नोंदवा. ओटीपी नोंदविल्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.

नवीन पेजवर तुम्हाला विचारलेली इतर माहिती, तपशील नोंदवा. त्यानंतर अत्यावश्यक दस्तावेजची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि ही माहिती सेव्ह करा. या प्रक्रियेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment