शेतकऱ्यांसाठी खुशखबर यावर्षी सरकार गहू खरेदी जास्त करणार त्यामुळे भाव वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी कमी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर यावर्षी सरकार गहू खरेदी जास्त करणार त्यामुळे भाव वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणा गहू खरेदीत आघाडीवर असलेली राज्य आहेत. या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी झालेली दिसत आहे. तर मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या खरेदीचं प्रमाण कमी झालं आहे. 

पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशने गहू खरेदीचा कालावधी हा 31 मे पर्यंत वाढवला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये आत्तापर्यंत जास्त गव्हाची खरेदी केली आहे. उत्तर प्रदेशातही गहू खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 124 लाख टन तर हरियाणामध्ये 71.4 लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे. 

गव्हाची खरेदी 270 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

कोणत्या राज्यात गव्हाची किती खरेदी?

पंजाब – 124 लाख मेट्रीक टन

हरियाणा – 71.4 लाख मेट्रीक टन

मध्य प्रदेश – 47.2 लाख मेट्रीक टन

उत्तर प्रदेश – 8.9 लाख मेट्रीक टन

राजस्थान – 9.1 लाख मेट्रीक टन 

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, एकूण गव्हाची खरेदी ही 270 लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरविण्याच्या अन्न सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याची खरेदीची पातळी आणि आमच्याकडे असलेला साठा पुरेसा असेल. आमच्याकडे बाजारासाठी चांगला साठा देखील असेल. 

सरकारकडून (Govt) मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat Procurement) सुरु आहे. मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची खरेदी 261 लाख टनांच्या जवळपास आहे. ही खरेदी 270 लाख टनांपर्यंत पोहोचेल असा विश्वास FCI च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. सध्या 260.8 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी झालीय. त्यामुळं सरकार यावर्षी मागील वर्षीच्या गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता दाट आहे. कारण अद्यापही अनेक राज्यांमध्ये सरकारकडून गव्हाची खरेदी सुरु आहे.

गरज पडल्यास किमती तपासण्यासाठी हस्तक्षेप केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील गव्हाची खरेदी कमी झालीय. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील खरेदीमध्ये लक्षणीय वाढ झालीय. सध्याची खरेदीची पातळी पाहता, सरकार यावर्षी गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवेल अशी शक्यता नाही. 

Leave a Comment