Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती तूर लागवड बद्दल माहिती.

Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती

Tur top Vheraity
Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती

Tur top Vheraity ; महाराष्ट्रात खरीपात तुर हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात तसेच विदर्भात तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.मध्यम ते उशीरा कालावधीच्या वानाची लागवड केली जाते. जमीनीच्या सुपिकतेनुसार व सिंचनाच्या योग्य सुविधा असल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. ज्या जमीनीत पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीत तुरीची लागवड केली जात नाही..

यावर्षी तुरीला विक्रमी बाजारभाव मिळाला आहे. त्या तुलनेत कापसाला अतीशय कमी दर मिळाला आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड कमी होऊन तरीची लागवड वाढु शकते. तुरीला चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि सिंचनाची सुविधा असल्यास चांगले उत्पादन घेणे सहज शक्य होते. या लेखात आपण तुरीच्या सुधारीत जातींची माहिती, वैशिष्ट्ये जाणुन घेणार आहोत.

1) ए.के.टी. ८८११
तुरीचा हा वान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे 1995 मध्ये प्रसारित झालेला आहे. दाण्याचा रंग लाल असुन सरासरी 100 दाण्यांचे वजन 09 ग्रॅम एवढे आहे. हा वान मर रोगास मध्यम प्रतिबंधक आहे. परिपक्वता कालावधी : 130 ते 140 दिवसाचा आहे. हेक्टरी उत्पादन: 10/11 क्विंटल.

2) बी. डी. एन. ७०८
हा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून 2004 मध्ये प्रसारित झाला असून कमी पर्जन्यमानाच्या भागांसाठी योग्य आहे. या जातीची शेंगा गर्द लाल असून दाणे सुद्धा चमकदार लाल रंगाचे असतात. सरासरी 100 दाण्यांचे वजन 10 ते 12 ग्रॅम एवढे असते. या जातीची वैशिष्ट्ये, मर व वांझ रोगास प्रतिबंधक तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडीस सहनक्षम. परिपक्वता कालावधी : 160 ते 165 दिवस एवढा आहे. हेक्टरी उत्पादन : 16 ते 18 क्विंटल आहे.

3) फुले राजेश्वरी
हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून 2012 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचा दाण्यांचा रंग लाल असून 100 दाण्यांचे वजन 11 ग्रॅम एवढे असते. मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. परिपक्वता कालावधी : 140 ते 150 दिवस आहे.हेक्टरी उत्पादन : 22 क्विंटल एवढे आहे.

4) बी. डी. एन. 716
हा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून 2016 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. पावसावर आधारित क्षेत्रात म्हणजेच कोरडवाहू जमिनीत ठरावीक वेळेत पेरणीसाठी योग्य आहे. या जातीची दाणे लाल व टपोरे असतात. मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक , 100 दाण्यांचे वजन : 11 ते 13 ग्रॅम. परिपक्वता कालावधी : 165 ते 170 दिवस. हेक्टरी उत्पादन: 18 ते 20 क्विंटल.

5) गोदावरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून 2021 मध्ये प्रसारित केला आहे. या वाणाची फुले ही मळकट पांढऱ्या तर दाणे पांढऱ्या रंगाची असतात. 100 दाण्यांचे वजन 11 ग्रॅम पर्यंत असते. हा वाण मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक असुन परिपक्वता कालावधी : 160 ते 165 दिवसाचा आहे.या वाणाचे हेक्टरी उत्पादन 19 ते 24 क्विंटल पर्यंत असते.

6) आय.पी.ए. 15-06
भारतातील कडधान्य संशोधन संस्था कानपूर येथे विकसित मध्य भारतात लागवडीसाठी 2021 मध्ये प्रसारित तर मर रोगास प्रतिबंधक, तर वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. दाण्याचा रंग लाल असून 100 दाण्यांचे वजन 9/10 ग्रॅम पर्यंत असते. या वाणाचा परिपक्वतेचा कालावधी 145 ते 150 दिवस एवढा आहे. आणि हेक्टरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल पर्यंत असते.

7) फुले तृप्ती
हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी यांच्याद्वारे विकसित करण्यात आला असून महाराष्ट्र , गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड येथेलागवडीसाठी 2022 मध्ये प्रसारित. मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक, तर शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो. दाण्याचा रंग फिक्कट तपकिरी. 100 दाण्यांचे वजन 10 ग्रॅम पर्यंत असते. या वाणाचा परिपक्वतेचा कालावधी : 160 ते 165 दिवसाचा आहे. आणि हेक्टरी उत्पादन : 22 ते 23 क्विंटल पर्यंत आहे.

7) रेणुका
हा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याद्वारे मध्य भारतासाठी 2022 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम असून 100 दाण्यांचे वजन 10/11 ग्रॅम पर्यंत असते.आणि परिपक्वतेचा कालावधी : 165 ते 170 दिवसाचा आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन: 19 ते 22 क्विंटल एवढे आहे.

Leave a Comment