सोयाबीन बियाणे भाव वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत.

Soyabin seeds ; सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

सोयाबीन बियाणे भाव वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत.

Soyabin seeds
Soyabin seeds ; सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

Soyabin seeds ; शेतकरी खरिप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज होत आहेत. हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत कारण सोयाबीन बियाण्याच्या दरात 300 ते 600 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरपासून सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करण्यास भाग पडले आहे. 2023 मध्ये दुष्काळ, खोडकिड आणि यलो मोजेक रोगामुळे उत्पादनात घट झाली. तरीही, बियाणे कंपन्यांनी दरात वाढ करून शेतकऱ्यांच्या पेरणी खर्चात वाढ केली आहे.

एका बियाणे कंपनीने 23 किलो बॅगसाठी 4150 रुपये आणि दुसऱ्या कंपनीने 25 किलो बॅगसाठी 3450 रुपये इतके दर निश्चित केले आहेत. याव्यतिरिक्त, काही कंपन्या नावाजलेल्या वाणासोबत त्यांचेच कीडनाशक खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. मागील हंगामाच्या तुलनेत, सोयाबीन बियाण्याच्या दरात सरासरी 300 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे.

335 आणि 9305 सारख्या काही पारंपरिक वाणांना कमी मागणी असल्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली नाही. बियाणे कंपन्या थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून बुकिंग आणि पुरवठा करत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या बिलांसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment