सोयाबीन खत व्यवस्थापन ; हे खत सोयाबीनला एकरी फक्त एवढे खत टाका,बंपर उत्पादन मिळेल

सोयाबीन खत व्यवस्थापन ; हे खत सोयाबीनला एकरी फक्त एवढे खत टाका,बंपर उत्पादन मिळेल

सोयाबीन खत व्यवस्थापन ; हे खत सोयाबीनला एकरी फक्त एवढे खत टाका,बंपर उत्पादन मिळेल

सोयाबीन खत व्यवस्थापन
सोयाबीन खत व्यवस्थापन ; हे खत सोयाबीनला एकरी फक्त एवढे खत टाका,बंपर उत्पादन मिळेल

सोयाबीन खत व्यवस्थापन ; या पोस्टमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी खताचे व्यवस्थापन कसे करावे, कोनते खत द्यावे, आणि एकरी किती किलो खत द्यावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत…

सोयाबीन पिकाला नायट्रोजन, स्फुरद, पालाश आणि सल्फर या चार पोषक तत्वांची आवश्यकता असते, तसेच काही सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे वापरता येतात. यामध्ये फॉस्फरस आणि पालाशचे जास्त प्रमाणात , नत्राची मध्यम प्रमाणात सुरुवातीच्या काळात आणि सल्फरची कमी प्रमाणात आवश्यकता असते.

बऱ्याच शेतकऱ्यांना नत्र, स्फुरद, पलाश ही भाषा लवकर समजत नाही, म्हणून आपण ही माहिती खाली सोप्या भाषेत पाहणार आहोत.

सोयाबीनला खत कधी द्यायचे..?

सोयाबीनचे पीक कमी कालावधीचे असल्याने पेरणीच्या वेळी खत टाकणे आवश्यक आहे… फुले व शेंगा आल्यानंतर खत दिल्याने सोयाबीनला फायदा होत नाही, त्यामुळे पेरणीबरोबरच खत द्यावे…

कोणते खत द्यावे आणि एकरी किती किलो द्यावे?

शेणखत असल्यास शेतात शेणखत पसरून घ्यावे…खाली काही खताचे पर्याय आपण दिले आहेत शेतकरी खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात

1) 12-32-16 (एकर 75-100 किलो + सल्फर 10 किलो) किंवा

2) 10-26-26 (एकर 75-100 किलो + सल्फर 10 किलो) किंवा

3) 14-35-14 (एकर 50-100 किलो + सल्फर 10 किलो) किंवा

4) सिंगल सुपर फॉस्फेट 150 – 200 किलो प्रति एकर (सल्फरची गरज नाही) किंवा

5) 20-20-0-13 (एकर 75-100 किलो + पोटॅश 30 किलो)

शेतकऱ्यांनी वरीलपैकी कोणताही पर्याय निवडल्यास सोयाबीनचे पीक निघेपर्यंत पुन्हा खत देण्याची गरज भासणार नाही आणि शेतकऱ्यांना सोयाबीनचे बंपर पीक मिळेल…

सोयाबीनच्या भावाचा विचार करता शेतकऱ्यांनी जास्त पैसा खर्च करू नये, कंपन्या आणि दुकानदार शेतकऱ्यांना लुटायलाच बसले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी खते खरेदी करू नयेत… उलट शेतकऱ्यांनी शेनखत वापरावे.

Leave a Comment