monsoon news ; मान्सून 04/जुन ला राज्यात येणार ; राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार.

monsoon news ; मान्सून 04/जुन ला राज्यात येणार ; राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार.

monsoon news
monsoon news ; मान्सून 04/जुन ला राज्यात येणार ; राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार…

monsoon news ; मान्सून 04/जुन ला राज्यात येणार ; राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार.

मान्सून ; केरळमध्ये मान्सूनचे आगमन 30/ मे रोजी झाले असून मान्सूनने केरळच्या आणखी भागात प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. पुढील दोन तीन दिवसात आणखी पुढे सरकेल आणि 04/जुन रोजी मान्सून राज्यामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. (Monsoon updates 2024)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा आणखी बळकट होणार आहे. मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून गोवा तसेच दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. हवामान विभागाचे निवृत्त डॉ शास्त्रज्ञ अनुपम कश्यापी यांनी दिलेल्या अंदाजानुसार मान्सून 03/जुन रोजी गोव्यात तर 04/जुन रोजी तळकोकणात येईल व 06/जुन रोजी पुण्यात दाखल होईल. (Havaman aandaj)

मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक स्थिती असुन पुढच्या दोन तीन दिवसात मान्सून अरबी समुद्राचा आणखी भाग, संपूर्ण केरळ, तमिळनाडूचा काही भाग, लक्षद्वीप, कर्नाटकच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागरात आणखी पुढे प्रगती करील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (New update monsoon 2024)

हवामान विभागाने दि. 02/ रोजी मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड विदर्भातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात उष्ण हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भ मराठवाड्यातील दक्षिण भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पुर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे..

Leave a Comment