शेतकऱ्यांना पेरणीची करू नका घाई. महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून

माणिकराव खुळे ; महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून नंतर हवामान तज्ञ माणिकराव खुळे

शेतकऱ्यांना पेरणीची करू नका घाई. महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून

माणिकराव खुळे
माणिकराव खुळे ; महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून नंतर हवामान तज्ञ माणिकराव खुळे…
माणिकराव खुळे; ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी मान्सूनचा नवा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कर्नाटकच्या किनारपट्टीवर पोहोचेल असे खुळे यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर त्याच्या प्रगतीला काही अडथळे येण्याची शक्यता असून त्याचा पुढील प्रवास हळूहळू होण्याची शक्यता आहे.

रेमल चक्रीवादळामुळे पूर्वेकडील राज्यातील वातावरणीय बदलामुळे मान्सून सरासरीपेक्षा दोन दिवस आधी देशात पोहोचला असला, तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्या तारखेपर्यंत म्हणजेच मुंबईत 10/ जूनपर्यंत धडकेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. (Havaman aandaj Maharashtra)

मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या सरींच्या शक्यतेसह सध्याची एकूण हवामान परिस्थिती पाहता, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी आवश्यक पावसाची जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे सुमारे 20/जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. (माणिकराव खुळे)

जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणतात की, शेतकऱ्यांनी अति आत्मविश्वासाने धूळ पेरणी किंवा कमी ओलावा असल्यावर पेरणी करण्याचे धाडस करू नये. 03/जून ते 10/जून या आठवड्यात फक्त मान्सूनपूर्व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. (Monsoon news 2024)

महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात ढगाळ हवामान राहिल आणि अगदी तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात मात्र ढगाळ हवामानासह पुढील ३ दिवस म्हणजे 02/ जूनपर्यंत दमट उष्ण हवामान जाणवेल. (माणिकराव खुळे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ आयएमडी पुणे)

Leave a Comment