सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या पध्दती अशी करा बिजप्रक्रिया.सोयाबीनला बीजप्रक्रिया

सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या पध्दती अशी करा बिजप्रक्रिया.
सोयाबीनला बीजप्रक्रिया

सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या  पध्दती अशी  करा बिजप्रक्रिया.
सोयाबीनला बीजप्रक्रिया
सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या  पध्दती अशी  करा बिजप्रक्रिया.
पेरणी पुर्वी बियाण्याला बिजप्रक्रिया करणे खुप महत्वाचे आहे बिजप्रक्रिया केल्याने पिकाची उगवन क्षमता वाढते, रोपांची संख्या जास्त असल्याने पिकाच्या उत्पादनात वाढ होते, रोपे निरोगी व उत्तम राहतात आणि किड व रोगावर नियंत्रण होते. बिजप्रक्रिया करण्याच्या तीन महत्वाच्या पध्दती खालीलप्रमाणे आहेत.1) जिवाणु संवर्धक 2) जैविक बुरशीनाशक 3) रासायनिक बुरशीनाशक.


1) जिवाणु संवर्धक


1 ) रायझोबीयम ; रायझोबीयम हे बक्टेरीयल स्वरुपात असतात. हवेतील नायट्रोजन शोषुण घेऊन पिकांना वेळेवर देण्याचे काम करतात. त्यामुळे बियाण्याला रायझोबीयम ची बिजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया करताना याचे प्रमाण 10 किलो ग्रँम बियाण्याला 250 gm रायझोबीयम घेऊन बियाण्याला हलकेसे चोळावे.


2) PSB ; स्पुरद विरघळनारे जिवाणु संवर्धक psb ची बिजप्रक्रिया केल्याने पिकांना फाँस्फेट युक्त खते विरघळण्यास मदत होते , पिकास उपलब्ध होते. जमिनीत असलेली फाॅस्फेट युक्त खते हे psb विरघळण्याचे कार्य करते. बीजप्रक्रिया करताना याचे प्रमाण 10 किलो ग्रँम बियाण्याला 250 gm रायझोबीयम वापरावे.


2)जैविक बुरशीनाशक

1) ट्रायकोडर्मा ; ट्रायकोडर्मा ची बिजप्रक्रिया करताना सर्वप्रथम बियाणे ताडपत्रीवर पसरुन घ्यावे. ट्रायकोड्रामा बियाण्यावर टाकुन थोडेसे पाणी टाकुन चोळुन घ्यावे व नंतर पेरणी करावी. प्रमाण : 1 कि.ग्रँ बियान्यासाठी 5 gm ट्रायकोडर्मा घ्यावे.


3)रासायनिक बुरशीनाशक
1) थायरम ; थायरमची बिजप्रक्रिया करताना 10 किलो बियाण्यासाठी 100 ml पाणी वापरुन बुरशी-नाशकाचे द्रावण तयार करुन बियाण्याला हलकेशे चोळुन बिजप्रक्रिया करावी. थोडेसे वाळुन नंतरच पेरणी करावी. 1 किलोग्रँम बियाण्यासाठी 3 ग्रॅम थायरम वापरावे.


2 ) कार्बोडेझीम ; कार्बोडेझीम ची बिजप्रक्रिया करताना 10 किलो बियाण्यासाठी 100 मिली पाणी वापरुन बुरशीनाशकाचे द्रावन तयार करावे आणि हवकेसे बियाण्याला चोळुन घ्यावे.नंतर बियाणे सावलीत थोडेसे वाळुन घ्यावे व नंतरच पेरणी करावी. बीजप्रक्रियेत याचे प्रमाण 1 किलोग्रँम बियाण्यासाठी 2.5 ग्रँम कार्बोडेझीम वापरावे.


रासायनिक बुरशिनाशक वापरताना कोनत्याही एकाची निवड करावी. एकापेक्षा जास्त रासायनिक औषधे वापरू नये.जैविक बुरशीनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक यापैकी कोणत्याही एकाची निवड करावी . कीटकनाशकानंतर रासायनिक बुरशीनाशकाची आणी शेवटी जिवाणु संवर्धकाची बिजप्रक्रिया करावी. हे सर्वानी लक्षात घ्यावे. बिजप्रक्रिया करताना खुप अगोदर बिजप्रक्रिया करून ठेऊ नये.बिजप्रक्रिया केल्यावर लगेच पेरणी करावी.

Leave a Comment