पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर

Weather forecast ; पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर

पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर

Weather forecast
Weather forecast ; पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर

Weather forecast ; हवामान विभागाने काल दि. 06/जुन रोजी मान्सून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. तसेच मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती असुन लवकर मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटवर द्वारे दिली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने आज दि. 09/जुन 10/जुन आणि 11/जुन रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 09/जुन रोजी ठाणे, नाशिक, पालघर, पुणे,नगर, संभाजीनगर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि संपूर्ण विदर्भात या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दि. 10/रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मान्सून राज्यात दाखल झाला असून मान्सून लवकरच संपूर्ण राज्यभर सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी चांगली ओल झाल्यानंतर पेरणी करावी अशी माहिती दिली आहे तरी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणीचा निर्णय घेऊ नये.

Leave a Comment