मान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस.


मान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस
मान्सूनने मराठवाडा व्यापला
मान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस

मान्सूनने आज संपूर्ण मराठवाडा व्यापला असून विदर्भातील यवतमाळ वाशीम, बुलढाणा ,अकोला पर्यंत मजल मारली आहे. तसेच संपूर्ण कोकण , पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जवळपास संपूर्ण भाग व्यापला असून गुजरात मध्ये एंट्री केली आणि तेलंगणाचा आणखी काही भाग व्यापला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुनला पुढील प्रगती साठी हवामान पोषक आहे आणि येत्या 24 तासात आणखी काही भागात मान्सून प्रवेश करील.

हवामान विभागाने राज्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज (11/जुन) कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार आणि विदर्भ मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

11 Jun, #Mumbai $Thane #NM and around recd wide spread rainfall in past 24 hrs with mod to heavy intensity. ☔☔
Last 3 hrs partially cloudy sky, light rain at isolated places.
📌The rainfall was more towards central Mumbai & south. pic.twitter.com/uS9wI9quIa

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2024

यंदा मान्सूनने राज्यात दमदार सुरुवात केली आहे आणि गेल्या तीन चार दिवसांपासून ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडल्याने खरीपाच्या पेरणीला जोरदार सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी पेरणी योग्य ओल झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत योग्य ओल झाल्यानंतर पेरणी करावी म्हणजे दुबार पेरणीचे संकटं येत नाही. जिल्हानिहाय हवामानाचे इशारे खालील प्रमाणे आहेत…

उत्तर कोंकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या pic.twitter.com/NL3za8ipG8

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2024

Monsoon advanced in sme more parts of N Arabian Sea,#Maharashtra, #Telangana on 11 Jun
Monsoon line 20.5°N/60°E,#Navsari, #Jalgaon,#Akola,#Pusad,#Ramagundam,#Sukma,#Malkangiri,#Vizianagaram,19.5°N/88°E,#Islampur
Likely to adv in sme more parts of Telangana,Chhattisgarh nxt 48hrs pic.twitter.com/5XSa4C41bF

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2024

Leave a Comment